Tarun Bharat

सहजयोग ध्यानाचे रविवारी सलग बारा तास प्रशिक्षण

सहजयोग ट्रस्टचे समन्वयक रवीकिरण माने यांची माहिती

प्रतिनिधी / कोल्हापूर

पुणे येथील श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्टच्यावतीने रविवारी, 3 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत सलग 12 तास सहजयोग ध्यान प्रशिक्षण आयोजित केले आहे. ते मोफत आहे. सहजयोगच्या संकेतस्थळ, युट्युब चॅनेलवर इच्छुकांनी या ध्यान प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजयोग समितीचे जिल्हा समन्वयक रवीकिरण माने यांनी केले.

जिल्हा सहजयोग समितीच्यावतीने येथील प्रेस क्लबमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बळवंत कुंभोजकर, रवींद्र बळगुंटे उपस्थित होते. माने म्हणाले, कोरोना काळात जगातील 4 लाख साधकांनी सहजयोग ध्यानसाधनेला प्रतिसाद दिला. माताजी निर्मलादेवी यांनी 50 वर्षांत जगातील विविध देशांत या ध्यानसाधनेची माहिती दिली आहे. माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट, राष्ट्रीय सहजयोग ट्रस्ट आणि पुणे येथील सहजयोग प्रतिष्ठानच्या वतीने सहजयोग 50 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी, 3 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या काळात 16 भारतीय भाषांत ऑनलाईन कुंडलिनी जागरण व आत्मसाक्षात्कार याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.ते म्हणाले

रविवारी हिंदीत सकाळी पावणेदहा ते साडे दहापर्यंत आणि मराठीत सायंकाळी सव्वापाच ते 6 वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. संस्थेच्या www.sahajayoga.org.in संकेतस्थळावर learningdahajayoga या युट्युबवर हे प्रशिक्षण पहायला मिळणार आहे. ग्लोबल रेकॉर्डस् अँड रिसर्च फौडेंशनने संस्थेला ऑनलाईन मेडिटेशन घेणारी सर्वात मोठी संस्था म्हणून गौरवले आहे. learningdahajayoga वरून रोज सायंकाळी 5 वाजता असे 6 आठवडे सहज योग प्रशिक्षण दिले जात आहे. रविवारी होणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माने यांनी केले.

Related Stories

वडगाव पोलीस ठाण्यासमोरच इलेक्ट्रीक दुकानात चोरी

Archana Banage

shivsenadasaramelava-शिवसेनेचा दसरा मेळावा अडचणीत? परवानगीच्या पत्राला BMC कडून उत्तर नाही

Rahul Gadkar

० ते ६ वयोगटातील बालकांचे हेल्थ कार्ड काढा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 5 जणांचा मृत्यू

Archana Banage

फुलेवाडी रिंगरोडवरील नागरिकांचा रूद्रावतार; खराब रस्त्यावरून संयमाचा बांध फुटला

Abhijeet Khandekar

संभाजीराजेंच्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात शिरलं पाणी

Archana Banage