Tarun Bharat

सहाजणांच्या टोळीला पाठलाग करुन पकडले

प्रतिनिधी/ मडगाव

चिंचोणे येथील एका दुकानात धाडसी चोरी केल्याच्या आरोपावरुन कुंकळी पोलिसांनी 6 जणांच्या एका टोळीला पाठलाग करुन अटक केली आहे.

चिंचोणे येथील पॅस्ट्री पॅलेस या दुकानात दोन महिन्यापूर्वी चोरी करण्यात आली होती आणि या चोरीप्रकरणी वॉल्टर बार्रेटो यांनी कुंकळी पोलीस स्थानकात तक्रार केली होती. ही चोरी 30 सप्टेंबर 2020 रोजी रात्रीच्यावेळी झाली होती. दुकानाचे शटर वाकवून चोरटय़ानी आत प्रवेश केला होता आणि ही चोरी केली होती. चोरटय़ांनी दुकानात असलेले सुमारे 3 हजार रुपयांची रक्कम लंपास केली होती.

मंगळवारी रात्री कुंकळी पोलीस गस्तीवर असताना त्याना चिंचोणे येथील एका मैदानाजवळ तीन स्कुटरवर एकूण सहाजण एकत्र असल्याचे आढळून आले. पोलीस येत असल्याचे पाहून हे सहाहीजण स्कुटरवरुन पळून जाऊt लागले असता पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले.

मध्यरात्रीच्या सुमाराला सहाजण कशासाठी एकत्र जमलेले होते असा सवाल पोलिसांनी केला असता ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यांना पोलीस स्थानकावर आणण्यात आले आणि त्यांची सखोल चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी चिंचोणे येथील वरील दुकानातील चोरीत आपला सहभाग असल्याचे कबुल केले.

रुमडामळ -दवर्ली येथील धर्मेदर चुन्नी चौहान (23), मोतीडोंगर -मडगाव येथील हनुमान कृष्णा निमण्णवर (21), बोर्डा -मडगाव येथील संकेश सिब्रन निशाद (19), बोर्डा -मडगाव येथील रणजीत तिबुनाल यादव (19), मडगाव येथील सुनिल नाईक (19) व आके -मडगाव येथील अक्षय पुंडलीक तलवार (18) अशी अटक करण्यात आलेल्या या सहाही संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 454, 457 व 380 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साहाय्यक उपनिरीक्षक सुरेश वेळीप या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Related Stories

आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात लेखी पत्र पंचायत सल्लामसलत करणार– गुळेली पंचायत

Patil_p

मांदेत भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा

Amit Kulkarni

विश्वजित राणे यांनी टाकला चेंडू मुख्यमंत्र्यांच्या न्यायालयात

Patil_p

म्हापसा बाजारात ग्राहकांची झुंबड

Amit Kulkarni

मगो नेते सुदिन ढवळीकरांची मागणी

Omkar B

नाताळाच्या शुभेच्छा!

Patil_p