Tarun Bharat

सहाय्यक निबंधक कार्यालयाचा शिपाई ‘लाचलुचपत’च्या सापळय़ात

चिपळूण

एका इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र तसेच संस्थेच्या मंजुरीसाठी शहरातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातील शिपाई कर्मचाऱयाला  7 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी घडली. या कारवाईनंतर खळबळ उडाली आहे.

दीपक शांताराम पाष्टे (42) असे या शिपायाचे नाव आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार वकील असून त्यांनी बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने एका इमारतीची गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करण्यासाठी चिपळूण सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. या इमारतीचे गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेची मंजूर उपविधी, ज्ञापन व सहकारी संस्था नोंदणी अधिसूचना, ताब्यात देण्यासाठी दीपक पाष्टे याने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱयांसाठी 12 हजार रुपयांची मागणी केली होती. यावर 7,000 रुपयांची तडजोड झाली. 14 डिसेंबर रोजी या पैशाची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार झाल्यानंतर या विभागाच्या पथकाने सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी सापळा रचून पाष्टे याला पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्र ला. प्र. वि. पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर तसेच रत्नागिरी विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, सहाय्यक फौजदार ओगले, पोलीस हेडकॉन्स्टेबल कोळेकर, नलावडे, पोलीस नाईक आंबेकर, पोलीस शिपाई पवार, गावकर, कांबळे आदींच्या पथकाने केली.

Related Stories

कोरोना टेस्ट सेंटरची जागा काही ठरेना…

Anuja Kudatarkar

बावशी येथे राहते घर कोसळले

Anuja Kudatarkar

कुडासे येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम संपन्न

Anuja Kudatarkar

डेगवे-बाजारवाडी येथे साईडपट्टीच्या मातीत ट्रक रुतून अपघात

Anuja Kudatarkar

दापोली खोंडा येथील अपघातात 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Archana Banage

अरविंद सरनोबत याना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

NIKHIL_N