Tarun Bharat

सहारा फौंडेशन उभारणार चॅरिटेबल हॉस्पिटल

प्रतिनिधी /बेळगाव

उज्ज्वलनगर येथील सहारा एज्युकेशन ऍण्ड वेल्फेअर फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने कोरोना काळात नागरिकांची सेवा करण्यात आली. नागरिकांना ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णवाहिका यासह इतर सेवा पुरविण्यात आल्या. नागरिकांना कमी किमतीत आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी उज्ज्वलनगर येथे चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू केले जाणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष सलमान शेख यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  केवळ दहा रुपये नाममात्र शुल्कात रुग्णांची तपासणी संस्थेच्या क्लिनिकमध्ये करण्यात येते. पुढील काळात ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर शाळा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना काळात सहारा फौंडेशनने 1 हजार 95 नागरिकांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला. 12 हजारांहून अधिक नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक औषधे दिली. नागरिकांच्या सेवेसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असून त्याला समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. माझ लखाणी यांनी केले. सेपेटरी जुबेर शेख, मुस्ताक अहमद फारूकीसह इतर उपस्थित होते.

Related Stories

कृष्णा नदीकाठावर पुन्हा धास्ती

Tousif Mujawar

चाकूच्या धाकाने कारचालकाची लूट

Amit Kulkarni

रात्री 9.30 पर्यंतच नाताळ साजरा करा

Omkar B

आरटीओ कार्यालयात सर्व्हर डाऊनचा घोळ

Patil_p

सौंदलगा नदीकाठावर दोन मगरींचा वावर

Patil_p

घटप्रभा साखर कारखान्यातील गैरप्रकाराची चौकशी करा

Amit Kulkarni