Tarun Bharat

सहावी माळ : करवीर निवासिनीची ‘काशी विश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात पूजा

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवाचा आजचा सहावा दिवस आहे. षष्ठी तिथीला करवीर निवासिनी शिवांची आराध्या बनवून विराजमान आहे. या प्रसंगाची पार्श्वभूमी अशी की, करवीर क्षेत्रात असलेले ‘दशाश्वमेध तीर्थ ‘ व त्याचे महत्त्व श्री शिव पार्वतीला सांगतात आणि उमेसह करवीर क्षेत्री राहण्यासाठी क्षेत्र देवतेची, म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात.

तेव्हा महालक्ष्मी श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास आणि येथील प्रत्येक जीवास अंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. तोच ईशान सध्या महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूचा ‘काशीविश्वेश्वर ‘ त्याच्यासमोर काशी कुंडही आहे . या स्तव करवीरास काशीचा दर्जा आहे. स्वतः करवीर निवासिनी करवीर महात्म्यात सांगते की, जे काशीविश्वेशाचे आणि महालक्ष्मीचे नित्य दर्शन घेतात, त्यांचे दर्शन सफल होते. आजची पूजा मकरंद मुनिश्वर आणि माधव मुनिश्‍वर यांनी बांधली.

Related Stories

कोल्हापूर : इचलकरंजीत बालिकेवर लैंगिक अत्याचार

Abhijeet Shinde

उत्रे परिसरात गव्यांकडून पिकांचे नुकसान

Sumit Tambekar

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने 8 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

वारणा साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक गोविंदराव जाधव यांचे निधन

Abhijeet Shinde

Kolhapur: कर्नाटक-महाराष्ट्र बस सेवा सुरु

Archana Banage

गांधीनगर मुख्य रस्त्यावरील डायट डिलाईट कॅफे अँड रेस्टो हॉटेलवर छापा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!