Tarun Bharat

सहा देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या घटली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. मात्र, तीन महिन्यानंतर सहा देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामध्ये ब्रिटन, कॅनडा, इटली, आयर्लंड, डेन्मार्क आणि आईसलँड यांचा समावेश आहे. मात्र, भारतात अद्याप अशी परिस्थिती दिसून येत नाही.

संशोधक प्रा. रिजो यांनी सांगितले की, ओमिक्रॉन हा व्हेरिएंट घातक नसल्याचे आतापर्यंत शास्त्रज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणातून समोर आले आहे. आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे तीन महिन्यानंतर ओमिक्रॉनचा संसर्ग कमी झाल्याचे सहा देशांमध्ये दिसून येते. भारतात अद्याप अशी परिस्थिती नाही. भारत सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. भारतात दररोजच्या संसर्गाचे प्रमाण 16 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग 13 टक्क्यांवर आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात दररोज अडीच लाखांहून अधिक प्रकरणे नोंदविली जात आहेत. 7 ते 15 जानेवारी दरम्यान देशात 17.50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 7743 ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत.

भारतातील 5 टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना आता रुग्णालयात दाखल केले जात आहे. मात्र, पुढील काही दिवसांत हा दर पाच ते दहा टक्के असू शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

Related Stories

तैवानमध्ये क्षेपणास्त्र शास्त्रज्ञाचा संशयास्पद मृत्यू

Patil_p

दिल्ली-दोहा विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

Patil_p

गद्दारांना माफी नाही; जयसिंगपूरात आदित्य ठाकरे गरजले

Abhijeet Khandekar

बेळगावच्या शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये अत्याचार

mithun mane

आसाम-नागालँड सीमेजवळील चकमकीत डीएनएलएचे ६ दहशतवादी ठार

Archana Banage

सुरतमधील दोन विद्यार्थिनींनी शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा लघुग्रह

datta jadhav