Tarun Bharat

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विनापरवाना शस्त्रास्त्रासह घुसलेला चौथा संशयित ताब्यात

Advertisements

शिराळा/प्रतिनिधी

चांदोली येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या पैकी चौथा संशयित आरोपी रमेश तुकाराम घाग (वय ५३) रा.बामणोली (ता. संगमेश्वर) यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल, एक बंदूक व बॅटरी वन विभागाने जप्त केली आहे. त्यास देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ तारखेपर्यंत वन कोठडी दिली आहे.

१ एप्रिलला यातील संदिप तुकाराम पवार, रा. हातिव- गोठणे पुनर्वसन , मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर रा. गुरववाडी, मारळ ता. संगमेश्वर या तीन आरोपींना रत्नागिरी न्यायालयाने ७ एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने शस्त्रासहित व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विणापरवाना घुसणे या आरोपींना चांगलेच महागात पडले. अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेन्यात आरोपी ३१ मार्च रोजी दिसून आले. त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दमाने यांनी दाखल केला.

वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयास माहिती दिली होती. त्यानुसार विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांनी चांदोली येथे तपास पथक तयार करून पुढील तपासाची दिशा ठरवली. तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात चौकशी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी हातिव ( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला. त्यावेळी संदीप तुकाराम पवार, रा. हातिव- गोठणे पुनर्वसन येथे संशयीत आढळून आला. त्याला चौकशीसठी ताब्यात घेतले. २ एप्रिलला तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार मारळ( ता. संगमेश्वर) येथील मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना रत्नागिरीच्या न्यायाधीशांनी आरोपींना ७ एप्रिलपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत, उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, फिरते पथकचे वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार, वनपाल एच.ए. गारदी, वनरक्षक गोठणे, रामदास दणाने, वाहनचालक सचिन पावर, अनंत मुळे, सागर पाटील, वन्यजीव प्रेमी प्रतिक मोरे यांनी केली. त्यांना रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी दिपक खाडे, वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका लगड, वनपाल देवरूख तौफिक मुल्ला, वनरक्षक गावडे व पोलिस पाटील, सरपंच यांचीही मदत मिळाली.

Related Stories

सातारकरांसाठी क्षारमुक्त पाणी

datta jadhav

कोयना नदीत आढळले तीन बॉम्ब

Patil_p

तुटलेल्या विजतारेच्या शॉकने पती-पत्नीचा मृत्यू

Patil_p

दुरूस्तीनिमित्त शहरातील काही भागास पाणी पुरवठय़ास व्यत्यय

Patil_p

नायकाचीवाडी येथे आढळला मृत कोल्हा

datta jadhav

सावधान : सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय

Abhijeet Shinde
error: Content is protected !!