Tarun Bharat

सांखळीचा नगराध्यक्ष आज ठरणार तीनजणांचे अर्ज दाखल

Advertisements

माजी नगराध्यक्ष पुन्हा रिंगणात : सकाळी पालिका कार्यालयात होणार बैठक

डिचोली / प्रतिनिधी

   साखळी नगरपालिकेच्या सत्तानाटय़ात आजचा दिवस महत्त्वाचा असून सखळीचा नगराध्यक्ष आज बुध. दि. 17 जून रोजी ठरणार आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीत मंगळ. दि. 16 रोजी माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यासह अविश्वास ठराव दाखल करण्यात आलेल्या गटातील नगरसेवक यशवंत माडकर यांनी व धर्मेश गटातील कुंदा माडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी प्रवीणजय पंडित यांच्याकडे दाखल केलेले आहेत.

   गेली सलग सात वर्षे साखळी नगरपालिकेवर असलेली धर्मेश सगलानी यांनी सत्ता उतरविण्यात सखळीतील भाजपला यश आल्यानंतर आता नगराध्यक्ष निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दोन्ही गटांकडून आपापले आकडे शाबूत ठेवण्याबरोबरच ते वाढविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

   माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करणाऱया भाजपच्या आघाडी गटात सध्या दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, रश्मी देसाई, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर, यशवंत माडकर व राजेश सावळ या सात जणांचा समावेश आहे. तर धर्मेश सगलानी यांच्या गटात सगलानी यांच्यासह उपनगराध्यक्षा कुंदा माडकर, अन्सिरा खान, ज्योती ब्लेगन, दामोदर घाडी, राया पार्सेकर असे सहा जण होते. मात्र अविश्वास ठरावाच्या चर्चेसाठी झालेल्या बैठकीत नगरसेवक दामू घाडी यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देताना ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे धर्मेश गटाचे संख्याबळ एकाने उतरले होते. त्यामुळे सदर अविश्वास ठराव 7 विरूद्ध 5 अशा मतफरकाने संमत झाला होता.

   या राजकारणात दामू घाडी यांनी खेळलेल्या अनपेक्षित राजकीय खेळीमुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले होते. बैठकीनंतर सर्व भाजप आघाडीतील नगरसेवक रवींद्र भवनात गेले असता तेथे दामू घाडी यांची उपस्थिती सर्वांसह पत्रकारांनीही पाहिली होती. त्यानंतर अविश्वास जिंकलेल्या गटाकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका घेत नगराध्यक्ष कोण असणार यावर चर्चा झाली. त्या चर्चेत काही नगरसेवकांची नावे पुढे आली होती. मात्र पुढील राजकीय समीकरणांचा व शक्मयाशक्मयतेच्या राजकारणाचा विचार करून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या गटातर्फे यशवंत माडकर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पक्के करण्यात आले आहे, अशी माहिती मिळली आहे. तसेच या गटातर्फे केवळ यशवंत माडकर यांनीच अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे ते सिध्द होते.

   नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक राजेश सावळ तसेच नगरसेविका शुभदा सावईकर यांच्याही नवाची चर्चा होती. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. तर धर्मेश गटात उपनगराध्यक्षा असलेल्या कुंदा माडकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असल्याने हे राजकारण आता समजण्यापलिकडे गेले आहे. तरी आज बुधवारी होणाऱया निवडणूक प्रक्रियेत साखळीचा नगराध्यक्ष  ठरणार असून दोन्ही गट आपापल्या संख्याबळात वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

(ँर्दे) नगरसेवक राया पार्सेकर यांची बदली ?

   दरम्यान साखळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची निवडणूक आज बुध. दि. 17 रोजी होणार असताना आमोणा येथे कार्यरत असलेल्या सेसा वेदांतच्या पीआयपीमध्ये कामाला असलेल्या नगरसेवक राया पार्सेकर यांची कंपनीने तडकाफडकी काल गुरू. दि. 16 जून रोजी बेल्लारी कर्नाटक येथे बदली केली आहे. अशी माहिती राज्य शिवसेनेचे सरचिटणीस मिलींद गावस यांनी दिली. नगरसेवक राया पार्सेकर हे धर्मेश गटातील असल्याने त्यांना या निवडणुकीत अनुपस्थित ठेऊन धर्मेश गटाचे संख्याबळ कमी करण्याचा सत्ताधाऱयांचा डाव असल्याचा आरोप मिलींद गावस यांनी केला आहे. या काळात कोणाच्याही बदल्या झालेल्या नाहीत, अशा परिस्थितीत नगरसेवक राया पार्सेकर यांचीच बदली का ? असा सवाल गावस यांनी केला असून, हि बदली जर राजकीय दृष्टीकोनातून केली असल्यास सेसा वेदांतला आम्ही गप्प बसणार नाही. खास शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर दिले जाणार आहे. त्यासाठी कंपनीने तत्काळ सदर बदली मागे घ्यावी. अशी मागणी मिलींद गावस यांनी केली आहे.

Related Stories

कौतुकास्पद! सुकूर ठरली दिव्यांगस्नेही पंचायत

Amit Kulkarni

‘कोविड’चा फटका बसलेल्या मासेमारी मोसमाला समाप्तीचे वेध

Omkar B

युजीसी-नेट चे नवीन वेळापत्रक जाहीर

Archana Banage

अंमलबजावणी पथकाची धारबांदोडय़ात कारवाई

Amit Kulkarni

खाण लिजधारकांना दणका

Amit Kulkarni

निसर्गावरील आघात संवेदनशील माणसांना वेदना देणारा !

Amit Kulkarni
error: Content is protected !!