Tarun Bharat

सांखळीवासीयांमुळेच राज्याचा विकास करण्याची संधी

प्रतिनिधी/ डिचोली

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने या राज्याचा आणि आपल्या साखळी मतदारसंघाचा जोरदार विकास करण्याची संधी केवळ आपल्याला साखळी मतदारसंघातील जनतेमुळेच मिळाली. याबाबत आपण सांखळीवासियांचा सदैव कृतज्ञ आहे. गेल्या 21012, 2017 प्रमाणेच 2022 मध्येही असाच भरघोस पाठिंबा आपणास लाभणार, असा विश्वास मुख्यमंत्री तथा आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सांखळीच्या नवीन बसस्थानकाचे उदघाटन करण्यात आले.

     सांखळी मतदारसंघाचा आणि शहराचा आज पूर्णपणे कायापालट होत आहे. जनतेने दिलेल्या बळामुळे आज हे शक्मय होऊ शकले. पणजी शहरानंतर मास्टर प्लॅन तयार करून विकास साधणारे साखळी शहर आहे. येणाऱया काळात या शहराचा मोठा कायापालट पहायला मिळणार आहे. या मतदारसंघातील जनतेने आपल्या प्रत्येक कार्याला प्रेम व पाठिंबा दिला आहे. तोच पाठिंबा यापुढेही साखळी आणि राज्याला पुढे नेण्यासाठी मिळणार यात शंका नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले.

  राज्यातील भाजप सरकारची गेली दहा वर्षे सत्य, विकास आणि सातत्याची होती, तर येणारी पाच वर्षे समृध्दीची असणार. गेल्या दहा वर्षांतील दोन निवडणुकांमध्ये भाजपने जनतेसमोर जाहीरनाम्याच्या स्वरूपात ठेवलेली बरीचशी कामे पूर्ण झालेली आहेत. त्याचा अहवाल आम्ही पक्षाकडे ठेवला आहे. व तो जनतेसमोरही येणार आहे, असेही ते म्हणाले.

    माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सांखळीत गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे साकारण्यात आलेल्या आकर्षक अशा बसस्थानकाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरिष अडकोणकर, कंदब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, शुभदा सावईकर, रश्मी देसाई, महामंडळाचे संचालक दत्ताराम चिमुलकर, भीमराव देसाई व इतरांची उपस्थिती होती.

साखळीत अनेक प्रकल्प साकारण्यात यश

   साखळी मतदारसंघात गेल्या 2012 व 2017 साली आम्ही जारी केलेल्या जाहिरनाम्यातील 90 टक्के कामे पूर्ण केलेली आहेत. सर्व पंचायती आणि नगरपालिका क्षेत्रात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली आहे. नगरपालिका क्षेत्रात रवींद्र भवन, सरकारी इस्पितळाची इमारत व त्याचा दर्जा प्राथमिक केंद्र ते सामाजिक केंद्र करण्यात आला, सरकारी महाविद्यालयाची नवीन इमारत व उच्च शिक्षणचे कोर्सेस, अंतर्गत सर्व रस्ते पूर्ण, साखळी किल्ल्याचे काम सुरू, जर्जर बनलेले पोलीस आऊट पोस्ट नव्याने उभे केले. सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाचा नवीन साज चढवून त्याचा दर्जा वाढविला. सरकारी शाळेचे काम सुरू, होंडा ते सांखळी हा रस्ता रुंदीकरण, मलनिस्सारण प्रकल्प सुरू होऊन आता पूर्णत्वाकडे येत आहे. इस्पितळाची जुनी इमारत जमिनदोस्त न करता ती लीजवर ताब्यात घेऊन साई नर्सिंग इन्स्टिटय़ूटतर्फे आतापर्यंत मोठय़ा संख्येने मुलांना आरोग्य सेवेचे विविध कोर्सेसचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यातून तयार होऊन सुमारे 500 च्या वर मुलींना रोजगार प्राप्त झाला आहे, ही महत्वाची बाब आहे. राधाकृष्ण मंदिर सुशोभीकरण, तसेच लवकरच रूदेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करणार. राज्यातील. हाऊसिंग बोर्ड येथे सामाजिक सभागृह उभारला असून त्याचे लवकरच उदघाटन होणार. सुभाषचंद्र बोस बलोद्यान, वाळवंटी नदीवर जुन्या जागी नवा पूल साकारला. नगरपालिकेत नकारात्मक राजकारण न करता नगरपालिकेला भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. या कामांबरोबरच अनेक कामे भविष्यात होणार असून राज्यातील एक विकसित शहर म्हणून सांखळी भविष्यात प्रसिध्द होणार आहे. या सर्वांसाठी केवळ जनतेच्या सहकार्याची साथ हवी आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.

   कोनशिलेचा अनावरण करून तसेच फित कापून बसस्थानकाचे उदघाटन करण्यात आले. सांखळी लायन्स क्लबतर्फे बसस्थानकावर लोकांसाठी शुद्ध पेयजलाची सोय केली आहे. या सेवेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्ध प्रभू यांनी केले. स्वागत नगरसेवक आनंद काणेकर यांनी केले तर दत्ताराम चिमुलकर यांनी आभार मानले.

Related Stories

गोव्यात अवेळी पावसाच्या सरी

Amit Kulkarni

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शला सुवर्णपदक

Amit Kulkarni

फोंडय़ात डेंग्यूचे 38 सक्रिय रूग्ण; दत्तगड बेतोडा सर्वाधिक रूग्णांसह हॉटस्पॉट

Amit Kulkarni

भिरोंडा सरपंचांनी पिकविला भाजीचा मळा

Patil_p

फॅमेली – राजच्या मुद्यावरुन “आप ने भाजपला फटकारले

Abhijeet Khandekar

पणजी स्मार्ट सिटीचे 300 कोटी कुठे वापरल्याची माहिती नाही

Patil_p