Tarun Bharat

सांखळी नगराध्यक्षपदी यशवंत माडकर

Advertisements

पालिका भाजपकडे, मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त : धर्मेश सगलानी यांची सात वर्षांची सत्ता संपुष्टात

सांखळी / प्रतिनिधी 

सांखळीचे नगराध्यक्ष म्हणून यशवंत माडकर यांची निवड करण्यात आली. धर्मेश सगलानी यांची अविश्वास ठरावाद्वारे उचलबांगडी केल्यानंतर नव्या नगराध्यक्षांची निवड करण्यासाठी बुधवारी निवडणूक घेण्यात आली. त्यात सगलांनी यांनी पुन्हाही आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश खेचून आणता आले नाही. त्यांची सात वर्षांची सत्ता सात विरुद्ध पाच अशा फरकानेच त्यांच्या हातातून निसटली.

दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, राजेश सावळ, ब्रम्हा देसाई, रश्मी देसाई, आनंद काणेकर, शुभदा सावईकर या सात नगरसेवकांनी सगलानी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस बजावली होती. बुधवारी मतदानावेळी ते आपल्या मताशी ठाम राहिले. त्याद्वारे आता सांखळी पालिकेची सत्ता भाजपकडे गेली आहे.

सगलानी यांच्या गटात आता राया पार्सेकर, ज्योती ब्लेगन, कुंदा माडकर, अंसिरा खान, मिळून 5 नगरसेवकांचे समर्थन आहे. पालिकेच्या 13 सदस्यांपैकी दामोदर घाडी हे भाजपसमर्थक बनले. बुधवारी निवडणुकीत ते भाजपात सामील झाले तर ठरावावर भाजप समर्थनात सही करणारे राजेश सावळ गैरहजर राहिले. त्यामुळे सांखळी पालिका राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे.

सर्वांना विश्वासात घेऊनच विकासाला चालना ः मुख्यमंत्री

पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागात संघटीतपणे विकासकामांना चालना देणार आहे. सांखळीच्या आराखडय़ावरही लवकरच विचार होणार असून वर्षभरात कागदोपत्री व्यवहार पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. पालिका भाजपकडे आल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला व सत्ताधारी नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांचीही उपस्थिती होती.

राजेश सावळ गैरहजर

दरम्यान, सगलानी यांचे जवळचे मित्र दामोदर घाडी हे ठरावाच्या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामागील कारण कळू शकले नसले तरी ते सांखळीतच होते अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे निवडणुकीत ते कुणाच्या बाजूने राहतील यावर शहरात चर्चा चालू होती. 8 विरुद्ध 5 असे मतदान होईल, अशीही चर्चा होती परंतु सावळ यांनी निवडणुकीकडेही पाठ फिरविल्याने भाजपचे संख्याबळ सातच राहिल.

विकासात कुठेही कमी पडणार नाही ः माडकर

अनुभवी राजकारणी असल्याने सांखळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. भाजपचे सहकार्य, सांखळीतील नागरिक, नगरसेवक यांना विश्वासात घेऊनच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सांखळीचा विकास साधणार असल्याचे नगराध्यक्ष माडकर यांनी सांगितले.

Related Stories

केरये विष्णू सोमनाथ देवस्थानचा आजपासून नूतन मूर्तीप्रतिष्ठापना सोहळा

Amit Kulkarni

मये मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मिळणार नवीन युवा चेहरा

Amit Kulkarni

‘आम्ही पाणी देतो तुम्ही शेती करा’

Amit Kulkarni

कोकणी भाषा मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर

Patil_p

कारापूर कुडणे मतदारसंघातील मगोच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन.

tarunbharat

पणजी मनपा, बहुतांश पालिकांचे कर्मचारी मार्चच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

Omkar B
error: Content is protected !!