Tarun Bharat

सांखळी परिसरात ठिकठिकाणी रामनवमी उत्साहात

प्रतिनिधी /सांखळी

सांखळी मतदारसंघात रविवारी रामनवमी उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेळगे महादेव मंदिर, सुर्ला श्री नारायण देव मंदिर, न्हावेली लक्ष्मी नारायण मंदिर सांखळी विठ्ठलापूर पांडुरंग देवस्थान रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी रामभक्तांनी दर्शना बरीच गर्दी केली होती. यानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सत्तरी तालुक्मयातील वांते गावातील श्रीब्रह्म चैतन्य ट्रस्टतर्फे रविवारी रामनवमी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात आला. सकाळी हभप वंदना जोशी यांनी ‘रामजन्म’ विषयावर कीर्तन सादर केले.  rयावेळी अयोध्येत सुरू असलेल्या राम मंदिराचे बांधकाम पाहणारे अभियंता गिरीश सहस्त्रभोजनी यांनी वांते रामनवमी उत्सवात उपस्थिती लावली. यावेळी राममंदिर निर्माण अभियंता म्हणून आपली भूमिका, कामकामाजाचा कार्यकाळ, दर्जा, या मागचा इतिहास याबाबतची रामभक्तांना सविस्तर माहिती दिली. दुपारी राम जन्म उत्सव साजरा करण्यात आला. महाआरती तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.

प्रभू श्री रामाचा आदर्श घेणे काळाची गरज : गिरीश सहस्त्रभोजनी

हिंदूंनी संघटित होण्याची ही वेळ असून प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन जीवन आनंदी आणि समृद्ध बनवा. ज्या पद्धतीने इतर धर्माचे लोक संघटित होतात तसेच आम्ही एकत्रित होताना दिसतात, आपले असंख्य देव आहे, प्रत्येकाचे देव वेगवेगळे तरीही आम्ही संघटित होऊन कार्य करणे ही आज काळाची गरज आहे. असे मत गिरीश सहस्त्रभोजनी यांनी राम भक्तांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

Related Stories

पर्रीकरांनी आजची कविडस्थिती योग्यरीत्या हाताळली असती- किरण कांदोळकर

Omkar B

मानवाधिकार आयोगाची मडगाव पालिकेला नोटीस

Patil_p

छत्रपती शिवारायांचा पराक्रम पाठ्यपुस्तकातून घरोगरी जावा: गोमंतकातील प्रसिद्ध चित्रकार संजय हरमलकर

Amit Kulkarni

पेडणे येथील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करुया

Amit Kulkarni

आता जनतेनेच परिवर्तन घडवून आणावे

Omkar B

कोनाडीचे माजी पंचसदस्य मनोहर आंबेकर यांचे निधन

Omkar B
error: Content is protected !!