Tarun Bharat

सांखळी राधाकृष्ण देवस्थानच्या मंदिर परिसरात सुशोभीकरण

सांखळी शहराचे भुषण ठरणार

सांखळी/प्रतिनिधी

सांखळी नगर पालिका क्षेत्रातील शहराच्या मध्यवर्ती असलेल्या जागृत देवस्थान राधाकृष्ण मंदिर परिसरात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुशोभीकरण करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे चार कोटी रुपये खर्च करून सर्व साधन सुविधा युक्त काम करताना दिसत आहे अतिशय पवित्र वातावरणात हे सुंदर असे शोभीकरण शहराचे भूषण ठरणार आहे

मुख्यमंत्र्यांचे शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान : अनिल काणेकर

सांखळीचे आमदार डॉ प्रमोद सावंत हे दूरदृष्टी लाभलेले लोकप्रिय नेता आहेत सांखळी शहराच्या विकासात महत्त्वाचे योगदान लाभले आहे आज जे राधाकृष्ण देवस्थानच्या परिसरात सुशोभीकरण सरकार तर्फ केलजात आहे ती मुख्यमंत्री डॉ सावंत यांची कल्पना होती  हे सुशोभीकरण देवस्थान ची शान वाढवणारे असून सांखळी करना अभिमान वाटेल असे हे काम आहे तसेच सांखळी शहरात सांखळी-करपूर पूल,बसस्था?नक असे महत्त्व पूर्ण प्रकल्प शहरात सुरू आहेत जे कुणी सांखळी शहरात काहीच झालं नाही म्हणतात त्यांनी सांखळी शहराची भेट घ्यावी असे राधाकृष्ण देवस्थान चे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी सांगितले

सांखळीत पर्यटनला वाव मिळेल : दयानंद बोर्येकर

सांखली नगरपालिका क्षेत्रातील श्री राधाकृष्ण देवस्थान परिसराचे सरकार साडेतीन कोठी खर्च करून साधन सुविधा युक्त सुशोभीकरण करत आहे ते पूर्ण झाल्यावर मनशांती प्रसन्नता वाटणार आहेतच उलट पर्यटन विकास ही होणार आहे शहरातील जे÷ नागरिक, मुलांना खेळण्यासाठी हे उपयुक्त असे ठिकाण ठरणार आहे तसेच मंदिराचा आणि सांखळी च्या नावात आणखीन भर पडेल असे त्या बद्दल मुख्यमंत्री सावंत याचे अभिनंदन असे स्थनिक नगर सेवक दयानंद बोर्ये कर यांनी या विषयी बोलताना सांगितले. देवस्थान चे महाजन आणि नगर सेवक आंनद काणेकर यांनी हीं या विषयी आपले विचार व्यक्त केले

Related Stories

चोविस तासात कोरोनाबाधित दुप्पट

Amit Kulkarni

योगेश गोयल यांच्याकडून ‘आयएमए’ ला मास्कचा पुरवठा

Omkar B

मोर्लेतील रामकृष्ण गावस यांचे स्टोन पेंटिंग सर्वांसाठी आकर्षण

Omkar B

बांबोळीत बॅरिकेटस् घातल्याने वाहतुक कोंडी

Amit Kulkarni

नऊशे जणांना 250 कोटींचा गंडा घालणारी महिला गजाआड

Patil_p

कला अकादमी 52 वी मराठी नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर

Amit Kulkarni