सांखळी
शहरात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शिव प्रति÷ान सांखळीतर्फे यंदाच्या वषी थोडक्मयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गोव्यात शिवाजी महाराजांप्रति एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे, त्यांनी आपल्या प्रजेसाठी केलेले काम, हिंदू संस्कृती च्या रक्षणासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. आपण इतिहासापासून चांगले घेतले पाहिजे. जो इतिहास विसरतो त्यांचे भविष्य धोक्मयात असल्याने, नेहमी ‘जी राजे आम्ही तुमच्या चरणी’ असे प्रत्येक युवकाला वाटले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी व्यक्त केले.
यानिमित्त शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवपूजनही करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, धीरज पेडणेकर, दयानंद बोर्येकर, गजानन देसाई, मिलिंद रेळेकर, युवराज नाटेकर, आदींची उपस्थिती होती.