प्रतिनिधी / सांगरूळ
गेली दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने कुंभी नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, सांगरूळ तालुका करवीर येथील रस्त्यावर पाणी आले आहे.यामूळे या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे.
सांगरूळ कुडित्रे फॅक्टरी मार्गावर रस्त्यामध्ये दोन ठिकाणी पाणी आले आहे. यामुळे सांगरूळसह परिसरातील म्हारूळ, खाटांगळे पासार्डे, आमशी,बोलोली, उपवडेसह बारा वाड्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे .

