Tarun Bharat

सांगरूळचा ऋतुराज नाळे गेट परीक्षा मेकॅनिकल सायन्समध्ये देशात दहावा

सांगरूळ / वार्ताहर

सांगरूळ येथील कु.ऋतुराज शिवाजी नाळे हा गेट परिक्षेत मेकॅनिकल सायन्स मध्ये संपुर्ण भारत देशात १० व्या तर मेकॅनिकल मध्ये १०८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला . त्याच्या या यशामुळे त्याची केंद्रशासनाच्या एन एम डी सी विभागामध्ये एक्झक्युटिव्ह इंजिनिअर या पदावर नूकतीच निवड झाली.या ठिकाणी त्याला वार्षिक पॅकेज सरासरी एकवीस लाख इतके मिळणार आहे.

ऋतूराजने आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सुरुवातीपासूनच उंचावत ठेवला आहे. ऋतुराजचे वडील सांगरूळ शिक्षण संस्थेच्या श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील सहाय्यक शिक्षक एस एम नाळे यांनी एक सामाजिक काम म्हणून सांगरूळ मध्ये २००१ साली स्व .गुरुवर्य डी डी आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या मदतीने मॉडर्न शिशुविहारची स्थापना केली.येथे पहिल्याच बॅचचा विद्यार्थी म्हणून ऋतुराजच्या शैक्षणिक जडणघडणीस सुरुवात झाली.

त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील कुमार विद्या मंदिर सांगरूळ मध्ये झाले. येथे अध्यापक एम टी नाळे यांचे मार्गदर्शनाखाली ऋतुराज चौथी स्कॉलरशिप मध्ये ३०० पैकी ३०० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आला . नवोदय विद्यालय कागल येथे त्याचे माध्यमिक शिक्षण झाले . इयत्ता दहावी परीक्षेमध्ये ९३ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला . उच्च माध्यमिकचे शिक्षण संजय घोडावत आय टी अकॅडमीमध्ये झाले .बारावीला असताना सीईटी परीक्षेमध्ये २०० पैकी १९२ गुण मिळवून महाराष्ट्रात तिसरा व संजय घोडावत कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला .जेईई मेन्स परीक्षेमध्ये २१२ गुण मिळवून ॲडव्हान्स परीक्षेसाठी तो पात्र झाला ॲडव्हान्स परीक्षेमध्ये १३६ गुण मिळवून देशात तो पाच हजार एकोणनव्वद क्रमांकावर येऊन आयडी जोधपूरमध्ये मेकॅनिकल मध्ये प्रवेश घेतला त्यानंतर त्यांनी गेट परीक्षा दिली.

या परीक्षेत मेकॅनिकल सायन्स मध्ये ऑल इंडिया रँक १० व मेकॅनिकल मध्ये ऑल इंडिया रँक १०८ मिळवल्यामुळे सेंट्रल गव्हर्मेंट ची एन एम डी सी कंपनी मध्ये त्याला सरासरी २१ लाख रुपये पॅकेजची नोकरी मिळाली . सध्या तो इंडियन ऑइल ओएनजीसी भाभा ॲटॉमिक रिसर्च साठी देखील पात्र आहे . नवोदय विद्यालय मध्ये असताना कुस्तीमध्ये तो नॅशनल खेळलेला आहे त्याचा आवडता गेम फुटबॉल असून आय आय टी जोधपूरच्या फुटबॉल टीम मधून तो नॅशनल साठी पात्र झालेला होता .त्याला शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर व वडील एस एम नाळे व आई शारदा नाळे यांचे मार्गदर्शन लाभले .

Related Stories

अरुण पाटील यांच्या वाढदिवस विशेषांकाचे माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Khandekar

Kolhapur; मराठा समाजाच्या प्रश्नांसंदर्भात गुरूवारी ‘सह्याद्री’वर महत्वपूर्ण बैठक

Abhijeet Khandekar

अंबाबाई मंदिरावरील १ हजार टनाचा बोजा हटवणार

Archana Banage

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

Archana Banage

अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात दुर्गेवाडी येथील दोन बकऱ्यांचा मृत्यू

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : संगणक परिचालकांचे सलग १४ दिवस आंदोलन सुरुच

Archana Banage