Tarun Bharat

सांगलीची ईश्वरी जगदाळे बुद्धिबळ स्पर्धेत देशात १६वी

ईश्वरीची चेस कॅडेट वर्ल्ड कपसाठी निवड
सांगलीची ईश्वरी जगदाळे देशात १६ वी, ईश्वरी जगदाळे हिची चेस वर्ल्ड युथसाठी निवड

प्रतिनिधी / सांगली

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) याच्या मार्गदर्शनानुसार ऑल इंडिया चेस फेडरेशन यांच्याद्वारे ऑनलाईन राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सांगलीची ईश्वरी जगदाळे हिने 11 पैकी 8 गुणांची कमाई करत 12 वर्षे मुली वयोगटात देशात 16वे स्थान मिळवले. वर्ल्ड युथ 2021 आणि कॅडेट वर्ल्ड कप 2021 स्पर्धासाठी तिची निवड झाली आहे. या स्पर्धामध्ये ईश्वरी भारताचे प्रतिनिधित्व करेल.

केपीचेस अकॅडेमीचे विजयकुमार माने यांच्याकडे ती गेली 5 वर्षे बुद्धिबळाचे प्रशिक्षण घेत आहे. ईश्वरी जगदाळे हिला 3 वर्षापुर्वी आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. तीने या 5 वर्षाच्या कालावधीत अनेक जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धामध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सातत्याने असेच प्रभुत्व राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर गुणवत्तेच्या बळावर कायम ठेवले.

ईश्वरी जगदाळे ही कांतीलाल पुरषोत्तम शाह प्रशालाची विद्यार्थिनी असून ती इयत्ता आठवीमध्ये शिकत आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे तिला मार्गदर्शन लाभले. ईश्वरीला तिचे आईवडील श्री व सौ डॉ. जगदाळे, आजीआजोबा यांचे प्रोत्साहन मिळाले.

Related Stories

विट्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Archana Banage

कोरोनानंतर आता मुंबईवर म्युकरमायकोसिसचे संकट

Tousif Mujawar

पंढरपूर – मायणी महामार्गावरील ‘त्या’ रस्त्याची उंची कमी न केल्यास आमरण उपोषण करणार

Archana Banage

टोकियो ऑलिंपिकमध्ये अशोककुमार एकमेव भारतीय कुस्ती पंच

Patil_p

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा पराभव

Patil_p

सर्व हॉकीपटू कोरोनामुक्त, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Patil_p