Tarun Bharat

सांगलीच्या दिव्यांग असलेल्या काजल कांबळेने वजीर सर करत घडविला इतिहास

दिव्यांग असलेल्या महिला गिर्यारोहक काजल कांबळेने दिला ‘लेक वाचवा लेक जगवा’ चा संदेश..!!

प्रतिनिधी / सांगली

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली येथील दिव्यांग असलेल्या काजल दयानंद कांबळे या महिला गिर्यारोहकाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा 280 फूट उंची असलेला सरळसोट वजीर सुळका सर केला. सुळका सर केल्यानंतर तिरंगा फडकवुन ‘लेक जगवा लेक वाचवा’ हा संदेश देत स्त्री शक्तीचा जागर केला.

महिला दिनानिमित्त केलेली ही साहसी मोहीम दिव्यांग असलेल्या काजल कांबळे हिने अवघ्या दिव्यांग बंधू-भगिनींना समर्पित समर्पित केली. सुळका आरोहन मोहिमेसाठी पॉईंट ब्रेक एडवेंचर या संस्थेने व जाॅकी साळुंखे यांनी खूपच मेहनत घेतली तसेच काजल हिला यासाठी गिर्यारोहक डॉ. समीर भिसे व दुर्गराज राजगडचे लेखक राहुल नलावडे यांचे उत्तम असे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

मोहीम फत्ते करणाऱ्या सर्व महिला गिर्यारोहकांचा समाजसेविका भारतीय महाक्रांती सेना राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा “जयश्रीमाई सावर्डेकर” यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Related Stories

पाण्याच्या नियोजनाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी जनआंदोलन गरज

Abhijeet Khandekar

विटा पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून ठाण्यातील घटनेचा निषेध

Archana Banage

सांगली : जत तालुक्यामधील सर्व सरपंच, उपसरपंच निवडी पुढे ढकलल्या

Archana Banage

सांगली : इस्लामपुरातील ‘या’ हॉटेलमध्ये जवानांना जेवणाचे संपूर्ण बील माफ

Archana Banage

सांगली : फाळकेवाडीच्या तलाठी व कोतवाल यांच्यावर कारवाईची मागणी

Archana Banage

सांगली : बंधाऱ्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला

Archana Banage