प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील प्रसिद्ध आमराई उद्यानाचा कायापालट करण्यात येत असून आयुक्त कापडणीस यांच्या प्रयत्नातून आमराईचा चेहरा मोहरा बदलण्यात येत आहे. आयुक्त कापडणीस नव-नवीन संकल्पना राबवत आहेत. तसेच वॉकिंग ट्रॅक सुद्धा सुधारणा करण्यासाठी २७ लाखांचे वर्क ऑर्डर काडून मुरूम साठवण्यांत येत आहे.


क्रीडाइचे दीपक सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करून सदर वॉकिंग ट्राकचे काम सुरू करण्यापूर्वी कायमस्वरूपी ट्रॅक व्यवस्थित राहण्यासाठी क्रीडाए कडून लेव्हल काडून देण्या बाबत विनंती करण्यात आली आहे. आमराईच्या बदलत्या स्वरूपाबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमराई मध्ये व्यायाम योगासने तसेच फिरण्यासाठी येणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या उद्यानात लहान मुलांची खेळण्यासाठी नेहमीच झुंबड उडालेली असते.