Tarun Bharat

सांगलीत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

प्रतिनिधी / सांगली

सांगली आगारात एसटी वाहक म्हणून सेवेत असणारे कवलापूर ता. मिरज येथील राजेंद्र निवृत्ती पाटील वय 42 यांचे गुरुवारी हृदय विकाराने निधन झाले.

ते सांगली आगारामध्ये कामास होते. पण एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामुळे ते सध्या घरीच होते. अधिक माहितीसाठी संपात सहभागी असलेल्या पाटील यांच्या एसटी कर्मचारी बांधवांशी सम्पर्क साधला असता, काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या बेकायदेशीर संपात सामील असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.

त्या आशयाच्या बातम्या वारंवार येत आहेत. त्यामुळे निलंबनाच्या धास्तीने पाटील हे काही काळ त्रस्त होते. यामुळे त्यांना ह्रदय विकाराचा धक्का बसून त्यांचे निधन झाले आहे. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी मृत पावलेल्या कर्मचाऱ्यास न्याय मिळालाच पाहिजे, तरच त्यांच्या आत्म्यास शांती लाभेल, असे यावेळी स्पष्ट केले. पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून, कर्मचारी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

Ratnagiri: जयगडच्या समुद्रात तेलवाहू बार्ज उलटलं, वस्तुंना हात न लावण्याच्या सूचना

Rahul Gadkar

बालकावर हल्ला करणारा बिबटय़ा 13 दिवसानंतर जेरबंद

Patil_p

पर्यटन व तिर्थक्षेत्र तसेच जिल्हाबंदीबाबत योग्य निर्णय घ्यावा

Patil_p

खरी शिवसेना कोणती हे उद्या कोर्ट सांगेल – शरद पवार

Archana Banage

नाटक घडत राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे : सागर कारंडे

Archana Banage

शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहा पदरीकरणास ‘बीओटी’ वर लवकरच सुरूवात…

Patil_p