Tarun Bharat

सांगलीत ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा

प्रतिनिधी / सांगली

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता ३ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाप्रमाणेच खासगी शिकवणी वर्गही बंद आहेत. अशा परिस्थितीत खासगी शिकवणी चालकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरवात केली आहे. शहरातील दीपक पाटणकर यांनी ऑनलाईन ‘संस्कृत’ चे वर्ग घेण्यास सुरूवात केली आहे. त्याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक गोष्टी वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा, महाविद्यालये त्याचबरोबर खासगी शिकवणीदेखील बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही खासगी शिकवणीचालकांनी ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा स्विकारला आहे. शहरात अनेक खासगी शिकवणी वर्ग आहेत. यापैकी काही शिकवणी चालकांनी ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे शिकविण्यास सुरूवात केली आहे.

शहरातील गावभाग परिसरात दीपक पाटणकर गेल्या पंधरा वर्षापासून खासगी शिकवणी वर्ग घेतात. संस्कृतवर प्रभुत्व असलेल्या पाटकरण यांच्याकडे संस्कृत शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची रांग लागलेली असते. इयत्ता ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते संस्कृतचे धडे देत असतात. कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने पाटणकरांच्याकडे संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर ऑनलाईल टिचींगचा उपाय पाटणकर यांनी शोधून काढला. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन पध्दतीने संस्कृत शिकवत आहेत. प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे त्यांनी ग्रुप तयार केले आहेत. विद्यार्थ्यांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.


Related Stories

राज्याची परिस्थिती चांगली कशी : चंद्रकांत पाटील

Archana Banage

बटरफ्लाय पॉईंट होणार कुलूपबंद

Patil_p

कराडकरांसाठी आनंदवार्ता : कोरोनाला हरविणाऱ्या 11 जणांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Archana Banage

देवाच्या काठीला आवाज नसतो, शंभर अपराध भरले की फटका बसतोच- शालिनीताई पाटील

Archana Banage

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे खासदार धैर्यशील माने साधणार संवाद

Archana Banage

कोल्हापूर, सोलापूरची सुवर्णसलामी

datta jadhav