Tarun Bharat

सांगलीत गॅस सिलेंडरचा स्फोट; चार झोपड्या शार्ट सर्किटने जळाल्या

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरातील जुन्या बुधगाव रोडवरील पंचशीलनगरमधील रेल्वे लाईनच्या बाजूला असणाऱ्या चार झोपड्या शार्ट सर्किटने जळून खाक झाल्या आहेत. या झोपड्यामधील सिलिंडर बाहेर काढत असताना एका सिलिंडरचा स्फोट होवून महापालिकेचा अग्निशमन विभागाचा कर्मचारी रामचंद्र चव्हाण हा २५ टक्के भाजला आहे. तर त्याच्याबरोबर इतर तीन कर्मचाऱ्यांनाही आग आटोक्यात आणताना भाजले आहे. या झोपडपट्टीतील सर्व संसार साहित्य जळून खाक झाले असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, पंचशीलनगर येथील रेल्वे लाईनच्या बाजूला पत्रा चाळ बजा झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमधील सर्व घरे दुपारी बंद होती. याच दरम्यान शार्टसर्किटने आग लागली. याची माहिती अग्निशमन विभागाला तात्काळ देण्यात आली. दरम्यान आगीचे बब येईपर्यंत आगीने चांगलाच पेट घेतला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणत असतानाच आतमध्ये शिरून याठिकाणी असणारे सात सिलिंडर बाहेर काढले आणि आठवा सिलिंडर बाहेर काढत असतानाच त्याचा स्फोट झाला त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी रामचंद्र चव्हाण हे २५ टक्के भाजले आहेत. ही आग आटोक्यात आली असून या चार घरांचे मिळून लाखांचे नुकसान झाले आहे.

Related Stories

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 44 हजार 540 नविन नाव नोंदणी

Sumit Tambekar

मारहाण झालेल्या साधूंचे जबाब घेण्यासाठी उमदी पोलीस उत्तर प्रदेशात

Abhijeet Shinde

कसबे डिग्रज पूरग्रस्त मदतीच्या गैरकारभाराची चौकशी ?

Abhijeet Shinde

Sangli; नेर्ले-येवलेवाडी परिसरात बिबट्याचा वावर

Abhijeet Khandekar

तांबवे दंडभाग परिसरात ट्रॅक्टर चालकास लुटमारीचा प्रयत्न

Abhijeet Shinde

सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख पदी चिकुर्डेचे अभिजीत पाटील, मातोश्रीतुन आदेश

Rahul Gadkar
error: Content is protected !!