Tarun Bharat

सांगलीत नवे 14 कोरोना रुग्ण, तर 37 कोरोनामुक्त

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्यात सोमवारी नवीन 14 रूग्ण वाढले आहेत. तर 37 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या उपचारात अवघे 223 रूग्ण आहेत. मनपा क्षेत्रात नवीन दोन आणि ग्रामीण भागात 12 रूग्ण वाढले आहेत. तर एका रूग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात कोरोना पूर्णपणे आटोक्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर आता अत्यंत कमी झाला आहे. सोमवारी नवीन 14 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये दोन रूग्ण हे महापालिका क्षेत्रात वाढले आहेत. सांगली शहरात हे रूग्ण वाढले आहेत. ग्रामीण भागात 12 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात पाच, कडेगाव तालुक्यात तीन आणि खानापूर तालुक्यात दोन रूग्ण वाढले आहेत. तासगाव तालुक्यात एक तर वाळवा तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. जत, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा, वाळवा आणि पलूस तालुक्यात नवीन एकही रूग्ण वाढला नाही. त्यामुळे या तालुक्यांना दिलासा मिळाला आहे.

सोमवारी उपचार सुरू असताना एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू मिरज ग्रामीण भागात झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 1 हजार 727 रूग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे. सोमवारी 37 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर 45 हजार 452 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट आता 96 टक्के इतका झाला आहे.

नवे रूग्ण – 14

उपचारात – 223

बरे झालेले – 45452

एकूण – 47402

मृत्यू – 1727

Related Stories

धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार

datta jadhav

महापूर घोटाळ्याची चौकशी करा, अब्दुललाट ग्रामस्थांचा ठिय्या

Archana Banage

“बोरू बहाद्दर कारकून आणि ‘ढ’ टीम चे कप्तान तोंडावर आपटले”; मनसेचा शिवसेनेवर निशाणा

Archana Banage

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध रस्ते कामांचा लोकार्पण समारंभ

Archana Banage

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी घेतली शरद पवार, राज ठाकरेंची भेट

Archana Banage

सोलापूर शहरात नवे 45 पॉझिटिव्ह, 2 जणांचा मृत्यू

Archana Banage
error: Content is protected !!