Tarun Bharat

सांगलीत प्रजासत्ताक दिनी शुद्धपेयजलाचे उद्घाटन

Advertisements

प्रतिनिधी / सांगली :

           सांगली येथील पुरोहित कन्या प्रशालेत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी विंदा गोरेनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी ध्वजगीतासह संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक भारत घाडगे यांनी केले.

          भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा केतकर व त्यांचे पारिवारिक खाडिलकर कुटुंबीय यांचे द्वारा 3000 विद्यार्थिनींच्या क्षमतेचे शुद्ध पेयजल संयंत्रयाचे उद्घाटन सांगली शिक्षण संस्थेचे कार्यवाह, मा.शशिकांत देशपांडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. नितीन खाडिलकर, कार्यवाह सतीश गोरे, ज्येष्ठ संचालक अरविंद मराठे, उपमुख्याध्यापक अनिल मासुले, पर्यवेक्षक सुनील कुलकर्णी यांच्यासह देणगीदार लाटकर व करमरकर कुटुंबीय उपस्थित होते.

          यावेळी सर्वच सुजाण नागरिकांनी आपल्या सभोवतालच्या विविध ठिकाणी सक्रियपणे शुद्ध पेयजल, स्वच्छता अभियान, विजेची बचत, वाहतूक नियम पाळणे अशा विविध उपक्रमातून आपण नक्कीच आपल्या देशाची प्रगती करू शकतो, असे मत व्यक्त केले. मा.नितीन खाडिलकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन शरद कांबळे यांनी तर आभार श्री संदीप पोरे यांनी मानले.

Related Stories

सांगली : मिरजेतील भाजी मंडईचे काम २० दिवसात सुरू करू – महापौर

Abhijeet Shinde

इस्लामपुरात मोटारसायकल चोरट्यास अटक

Sumit Tambekar

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात 30.4 मि. मी. पाऊस

Abhijeet Shinde

सांगलीत मनपा कर्मचाऱ्यांनी घडवले माणुसकीचे दर्शन

Abhijeet Shinde

सांगली : भाजप सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा – आ. सुधीर गाडगीळ

Abhijeet Shinde

यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल

Sumit Tambekar
error: Content is protected !!