Tarun Bharat

सांगली : अंकलखोपमध्ये कोरोना योध्दाचा अहवाल पॉझिटिव्ह

५ दिवस गाव बंद ठेवण्याचा ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने घेतला निर्णय.

भिलवडी / वार्ताहर

अंकलखोप (ता. पलुस) येथील एका ३० वर्षीय कोरोना योध्द्याला कोरोनाची लागण झाली आहे. बाधित व्यक्ती सांगली येथील शासकीय व्हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देत आहे. सदर व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजताच भिलवडी, नागठाणेसह परिसर कोरोनाच्या धास्तीने हादरून गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन व ग्रामस्थांनी स्वयंस्फुर्तीने ५ दिवस अंकलखोप गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दि. २६ जुलै रोजी पलूस तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तिंच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, तालुक्यातील दुधोंडी, ब्रम्हनाळ, नागठाणे, बांबवडेसह माळवाडी, खटाव, मध्ये कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्यामुळे पलूस तालुक्यामध्ये कोरोनाच्या धास्तीने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अंकलखोप येथील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समजताच सदर गावांमध्ये पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास धेंडे यांनी तात्काळ भेट देऊन, बाधीत व्यक्तीच्या कुटुंबातील व जवळच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले. त्याचबरोबर अंकलखोप येथील सदर परिसरात सील करण्यात आला असून, सदर भागात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला.

अंकलखोप येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने तात्काळ संपूर्ण गावांमधून औषध फवारणी केली असून, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार पुढील ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर अनावश्यक कारणासाठी, गाडीवरून डबल सिट प्रवास करणारे, विना मास्क रस्त्यावरून व सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तीस प्रत्येकी बाविशे रुपये दंड करणार असल्याची माहिती पोलिस अधिकारी यांनी सांगितले.

Related Stories

महाराष्ट्रात अखेर 15 दिवसांसाठी संचारबंदी

Archana Banage

सांगली : मिरज-पंढरपूर रस्त्यावर दरोडेखोरांचा थरार

Archana Banage

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन; कोरोनाविरुद्धची झुंज ठरली अपयशी

Archana Banage

शालेय विद्यार्थ्यांना दिवाळीची 5 दिवस ‘ऑनलाईन’ सुट्टी!

Tousif Mujawar

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी काटेकोर नियम पालन करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

कोल्हापूर : जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

Archana Banage