Tarun Bharat

सांगली : ..तर लॉकडाऊन पुन्हा वाढवावे लागेल : पालकमंत्री

Advertisements

वाढता कोरोना आणि मृत्यूदरही चिंताजनक ः नियमांचे पालन करण्याचे आवाहन

प्रतिनिधी/सांगली

 गेल्या काही दिवसांपासून जिल्हÎात कोरोना रूग्णांची संख्या स्थिर आहे. पण ही वाढलेली रूग्णसंख्या आणि मृत्यूदर दोन्ही बाबी चिंताजनक असल्याचे स्पष्ट करत परिस्थिती अशीच राहिली तर कडक लॉकडाऊन आणखी वाढवावा लागेल असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी दिला आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

 प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश देतानाच  नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. रविवारी पालकमंत्री जयंत पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व आमदारांशी ऑनलाईन बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, जिह्यात सध्या कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असला तरी सरासरी तो 22 टक्के पर्यंत आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट कमी होणे आवश्यक आहे. पाच ते  26 मे पर्यंत सुरू असणाऱया कडक निर्बंधांबाबत 28 दिवसानंतर म्हणजे 14-14 दिवसांचे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर रुग्ण संख्येत किती फरक पडतो याची पुन्हा एकदा मीमांसा केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या गावांमध्ये ग्राम समित्यांनी निर्बंधांची अंमलबजावणी अत्यंत चांगली केली, तेथील रुग्ण संख्या कमी आली आहे. सर्वच ग्राम समित्यांनी अधिक सक्षमपणे, एकत्रित काम करणे आवश्यक आहे. तसेच पोलीस यंत्रणेने प्रतिबंधात्मक निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करावी, असे  आदेशही त्यांनी यावेळी दिले.

 सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आ. सदाभाऊ खोत, आ.अरुण लाड, आ. गोपीचंद पडळकर, आ. अनिल बाबर, आ. सुधीर गाडगीळ, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले- बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

म्युकर मायकोसिसच्या उपचाराचेही नियोजन करा

 पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत जिह्यात म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे, त्यामुळे जिह्याच्या मध्यवर्ती ठिकाणातूनच या रुग्णांवर उपचार व्हावेत. तसेच  डॉक्टर्सना या आजाराचा धोका कमी करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, यासाठी ऑनलाईन वर्कशॉप घ्यावा, अशा सूचना केल्या. म्युकर मायकोसिसची रुग्ण संख्या किती पर्यंत वाढू शकते याचा अंदाज घेऊन आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे, असेही सांगितले.

कम्युनिटी आयसोलेशन कडक करा

 रुग्ण वाढ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने गावागावांमधून कम्युनिटी आयसोलेशन प्रभावीपणे व्हावे. एखाद्या घरातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या कुटुंबातील अन्य सदस्यांना ही आयसोलेशनमध्ये ठेवावे, अशाही सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी लॉकडाऊनच्या काळात रुग्ण संख्या वाढत आहे याचा यंत्रणेने अधिक गांभीर्याने कारणमीमांसा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तिसऱया लाटेच्या अनुषंगाने  बालरोग तज्ञांची बैठक घ्यावी व अनुषंगिक तयारी ठेवावी असे निर्देशित केले. लॉकडाऊन निर्बंधांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरजही प्रतिपादित केली.

 साडेतेराशेवर रूग्णसंख्या स्थिर ः जिल्हाधिकारी

 जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी जिह्यात सध्या साडेसहा ते सात हजार टेस्टिंग होत आहे. तेराशे ते साडे तेराशे पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झालेली दिसून येत आहे. बाहेरच्या जिह्यातील रुग्णही आपल्या जिह्यात उपचारासाठी येत असून यातील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण दररोज दहा ते बारा आहे. असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिह्यात 72 रुग्ण म्युकर मायकोसिसचे असून त्यांच्यासाठी लागणाऱया औषधांचा पुरवठा पुरेसा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तिसऱया लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ञांच्या माध्यमातून मॉडेल तयार करण्यात येत आहे. शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून 18 वर्षाखालील मुलांचा सर्वे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Stories

डायरेक्टरच्या ‘हवेली’ वरील सिनेमा शुटिंगचा नेटकऱ्यांकडून समाचार

Abhijeet Shinde

सांगली : शिराळा कृषी विभागाच्यावतीने रब्बी पीकस्पर्धा

Abhijeet Shinde

जत येथे दिवसा चोरट्यांनी ३ लाख ७० हजार रुपये लांबविले; शेतकरी हतबल

Abhijeet Shinde

सांगली : बहे परिसर कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Sumit Tambekar

कुंडल ते बांबवडे दरम्यानचा राज्य महामार्ग राहणार बंद

Abhijeet Shinde

Sangli; आमचे बंड शिवसेना विरोधात नसून राष्ट्रवादी विरोधात : जिल्हा प्रमुख आनंदराव पवार

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!