Tarun Bharat

सांगली : अमेरिकेतील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.साहू यांची आरआयटीला भेट


प्रतिनिधी/इस्लामपूर


जगभरात नामांकित व सर्वोत्तम अशा शिक्षणासाठी नावलौकिक असणाऱ्या अमेरिकेच्या सदर्न युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. बिजोई साहू यांनी येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास सदिच्छा भेट
दिली. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत व महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.सुषमा कुलकर्णी यांनी डॉ.साहू यांचे स्वागत केले.


येथील राजारामबापू इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी व सदर्न युनिव्हर्सिटी अमेरिका यांच्यात नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार संपन्न झाला. या कराराच्या पार्श्वभूमीवर डॉ.साहू यांनी ही भेट दिली. जगातील सर्वोत्तम शिक्षण देणाऱ्या विद्यापीठाच्या यादीत ३२४ क्रमांकावर असणाऱ्या या विद्यापीठाचा दर्जेदार शिक्षणासाठी जगभरात गणली जाते. यावेळी डॉ साहू यांनी शिक्षणाविषयक अनेक विषयांवर चर्चा केली. विशेषतः त्यांनी महाविद्यालयातील इन्फ्रास्ट्रक्चर दर्जेदार शैक्षणिक सोयी सुविधा, रिसर्च, कन्सलटेन्सी या गोष्टींचे कौतुक केले. या करारांतर्गत सदर्न युनिव्हर्सिटी व आर आय.टी.मिळून इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंटस भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी एकत्र सेमिनार्स घेणार आहेत. यावेळी डीन डॉ.सचिन के पाटील यांनी अकॅडेमिक्स एज्युकेशनल स्ट्रक्चर व डॉ. आनंद काकडे यांनी रिसर्च अँड कन्सल्टन्सीचे प्रेझेन्टेशन दिले. प्लेसमेंट हेड डॉ.अभिजीत शाह यांनी आभार मानले.


६ हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती


देशाच्या ग्रामीण भागात दर्जेदार तंत्रशिक्षण आरआयटी देत असल्याने डॉ.साहू हे प्रभावीत झाले. त्यांनी ‘मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, आणि एम बी.ए.इन सप्लाय चैन मॅनेजमेंट या
विषयातील उच्च शिक्षणासाठी प्रति सेमिस्टर ६ हजार डॉलर्सची शिष्यवृत्ती
आरआयटीच्या विद्यार्थ्यांना मंजूर केली. या शिष्यवृत्तीचा फायदा जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन डॉ.साहू यांनी केले.

Related Stories

Rajgad राजगड आमच्यासोबत फिरा…एक लाख रुपये देतो; पुरातत्व अधिकाऱ्यांना शिवप्रेमींचे आव्हान

Abhijeet Khandekar

कडेगाव तालुक्यात पाण्याअभावी पिके धोक्यात; शेतकऱ्यांना टेंभूच्या पाण्याची प्रतिक्षा

Archana Banage

रंगमंच पूजनाने नाटयगृह सुरू

Archana Banage

सांगली : नांद्रेतील पूरग्रस्त मदतीपासून अजूनही वंचित

Archana Banage

सांगली जिल्हय़ात विक्रमी 998 पॉझिटिव्ह, 32 बळी

Archana Banage

खासगी महिला सावकाराकडून १ लाख ८० हजाराच्या बदल्यात ७ लाख २० हजाराची वसुली

Archana Banage