Tarun Bharat

सांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/सांगली

खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथे अहमदाबादवरून एक कुटुंब आले होते. यामधील पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे पती-पत्नी 6 दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी साळशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी विटा ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आली.

दरम्यान या पती-पत्नीमध्ये कोरोना ची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना मिरज सिव्हील हॉस्पिटलकडे पाठवण्यात आले. त्या मध्ये या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सदर महिलेच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे दोघेही आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले होते. त्यामुळे त्यांचा इतरांशी संपर्क कमी आला आहे. तरीसुद्धा प्रशासनातर्फे अनुषंगिक उपाययोजना तात्काळ करण्यात येत आहेत.

तर, जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 38 झाली आहे. सध्या उपचारात नऊ रुग्ण आहेत.

Related Stories

केंद्रीय जल आयोगाच्या वरिष्ठ पथकाची पूरपट्टयात धावती भेट

Archana Banage

मिरज-बेडग रोडवरील कचरा डेपोस आग, परीसरात धुराचे लोट

Archana Banage

विनापरवाना बांधकामाच्या निषेधार्थ उचगावमध्ये सोमवारी आंदोलन

Archana Banage

इचलकरंजीच्या वृद्धाचा मृत्यू, आणखी ८ पॉझिटिव्ह

Archana Banage

Sangli; महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी व्हावी यासाठी विराट मोर्चाचे आयोजन

Abhijeet Khandekar

मोरबी पूल दुर्घटनेत भाजपा खासदाराच्या कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू

Archana Banage