Tarun Bharat

सांगली : आटपाडी शहरात ११ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’

बुधवारपासून कडकडीत बंद

प्रतिनिधी / आटपाडी

तालुक्याचे ठिकाण असलेल्या आटपाडी शहरात कोरोनाचा फैलाव गतीने होत आहे. सध्या शहरात समूह संसर्ग सुरू असून विषाणूची साखळी तोडण्यासाठी आटपाडीत बुधवार दिनांक ९ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असे 11दिवस ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात येणार आहे.

आटपाडी तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 650 च्या घरात पोचली आहे. दिवसेंदिवस औरंगाबाद वाढत आहेत आटपाडी शहरात बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वपक्षीय नेते व्यापारी व नागरिकांच्या सूचनेनुसार आटपाडीमध्ये ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात येत आहे. आरोग्य विभागावर कोरोनाच्या संख्येमुळे प्रचंड ताण आलेला आहे.

गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना उपचार मिळणे कठीण बनले असून कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी आटपाडी शहर कडकडीत बंद पाहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आटपाडीत ९ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर पर्यंत सलग ११ दिवस मेडिकल व दवाखाने चालू राहतील. तर सोमवार दिनांक १४ सप्टेंबर पासून सकाळी ९ ते ५ यावेळेत किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्डवेअर दुकाने चालू राहणार आहेत. मेडिकल दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यत सूर ठेवली जाणार आहेत.

कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी जनतेने कडकडीत बंद पाळावा. प्रशासनाला सहकार्य करावे. आणि कोरोनाचा अटकाव करण्यासाठी 11 दिवस कडक ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे.

Related Stories

सांगली : कुपवाडमध्ये रिक्षा चालकास तिघांकडून बेदम मारहाण

Archana Banage

सांगली : वारंवार पूराचा फटका बसणाऱ्या घरांचे तातडीने सर्व्हेक्षण करा – उपमुख्यमंत्री

Archana Banage

झाडाझडतीच्या भितीने महापालिकेत अधिकाऱ्यांची तारांबळ

Archana Banage

सांगली आयर्विन ब्रिज जवळ पाणी पातळीत सहा इंचाने घट

Archana Banage

सांगली : तासगाव धामणी येथील वृद्धेच्या खूनाचा उलगडा

Archana Banage

डंपरच्या धडकेने मोपेडवरील निवृत्त शिक्षक जागीच ठार

Abhijeet Khandekar