आळसंद / वार्ताहर
खानापूर तालुक्यातील आळसंद येथे एकाच दिवशी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मृतांमध्ये विष्णू धोंडी जाधव (वय ९०), नेताजी कृष्णा सुर्वे (वय ६५) व गोकुळा दत्ताञय कुंभार (वय ७५) यांचा समावेश आहे.गेल्या काही दिवसापूर्वीच विष्णू धोंडी जाधव यांच्यावर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उपचार सुरु होते, परंतू रविवारी त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेकजणांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.
तर नेताजी सुर्वे व गोकुळा कुंभार यांच्यावरदेखील विटा येथील रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांचादेखील उपचारादरम्यान मृत्यू रविवारी झालाय. त्यामुळे गावात एकाच दिवशी तिघांचे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात असून गावात भीतीचे वातावरण आहे.गेल्या आठवड्यात कोरोनाने दोघाजणांचा बळी घेतला आहे. विष्णू जाधव यांच्यावर रविवारी आळसंद येथे पीपीई कीट घालून अंत्यसंस्कार करण्यात आले तर नेताजी सुर्वे व गोकुळा कुंभार यांच्यावर विटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.


previous post