Tarun Bharat

सांगली : आष्ट्याच्या उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा

आष्टा/वार्ताहर

आष्टा नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष शेरनबाब देवळे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नगराध्यक्षा स्नेहा माळी यांच्याकडे देवळे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. देवळे यांच्या राजीनाम्यानंतर या पदी जिल्हा बँकेचे संचालक झुंझारराव शिंदे यांचे सुपुत्र धैर्यशील शिंदे यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.

दोन महिन्यापूर्वी स्वर्गीय विलासराव शिंदे यांचे खंदे समर्थक शेरनवाब देवळे यांची आष्टा नगरीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. दोन महिन्याच्या कालावधीत देवळे यांनी आष्टा शहराच्या विकासास गती देण्याचे काम केले. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यांनी आज उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यावेळी नगरसेवक विशालभाऊ शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बाबासो सिध्द उपस्थित होते. दोनच महिन्यात शेरनबाब देवळे यांचा राजीनामा घेतल्याने देवळे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी सांगलीत निदर्शने

Archana Banage

सांगली : आटपाडी शहरासह तालुक्यात 18 कोरोना रुग्णांची भर

Archana Banage

सांगली जिल्हा पूरस्थिती Live : अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवून अडीच लाख क्युसेस

Archana Banage

मनपा समाजकल्याण समितीत वादंग

Archana Banage

कडेगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

Archana Banage

विट्यात सव्वापाच लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

Archana Banage