प्रतिनिधी / सांगली
सांगली पोलिस दलातील एका उपनिरीक्षकासह आणखी दोन पोलिसांना कोरोनाची गुरुवारी लागण झाली आहे. सांगली शहर पोलिस ठाण्यात महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्य अँटिजन चाचणीत एका उपनिरीक्षकासह तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पोलीस दलात पुन्हा खळबळ माजली आहे.
यापूर्वी मिरजेतील महिला पोलिस अधिकारी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे कोरोना आता पोलिस दलात ही वेगाने पसरु लागला आहे. ही चिंतेची बाब होऊ लागली आहे.


previous post