Tarun Bharat

सांगली : ऑनलाईन शिक्षणापासून कन्नड माध्यमाचे विद्यार्थी वंचित

वार्ताहर / सोन्याळ

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन, जिल्हा परिषद आणि डाएट यासारख्या आदी संस्थेने विध्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मराठी व उर्दू माध्यमाच्या विध्यार्थ्याकरिता “शाळा बंद शिक्षण चालू” हा ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राज्यभर राबवत आहे.हे स्वागतार्ह आहे. परंतु कन्नड माध्यमाचे विद्यार्थी मात्र या उपक्रमापासून वंचित आहेत.यासाठी शासनाने कन्नड माध्यमातील तज्ञ शिक्षकाना आमंत्रित करून तसे अभ्यासक्रम तयार करवून घेऊन कन्नड माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात यावे अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.

सद्यस्थितीत कोरोना महामारी उग्ररूप धारण करून महाराष्ट्रात थैमान घातलेलं आहे.तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने “शाळाबन्द शिक्षण सुरू” हा उपक्रम राबवित आहे. हे स्तुत्य उपक्रम आहे. अनेक विध्यार्थ्याना या उपक्रमाचा फायदा होत आहे. या उपक्रमांतर्गत दीक्षा ऍप व ezee test app द्वारे फक्त मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थ्यांसाठी नमुना पाठ आणि व्हिडिओ बनवून त्यांचे सोय केलेली आहे पण कन्नड माध्यमाचे विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही .राज्य स्तरावर पाठ्यपुस्तक मंडळ व अभ्यास गटात अनेक कन्नड विषयाचे तज्ञ मंडळी कार्यरत असून त्यांचे उपयोग या कामासाठी करून घेता येईल.तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकार्यासमोरही या दोघांनी कन्नड माध्यमाच्या विध्यार्थ्याची कैफियत मांडलेले आहे. शासनाने पाठयपुस्तक आणि विविध अभ्यास मंडळावर कार्यरत असलेल्या तज्ञ कन्नड अभ्यासकाशी चर्चा करून राज्यातील जवळ जवळ 5500 शिक्षक व 40000 कन्नड माध्यमांची विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाची सोय करून द्यावी अशी मागणी कन्नड विभागाचे राज्य प्रतिनिधी व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि शिक्षक समितीचे नेते बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.

Related Stories

देशातील आर्किटेक्चर मैदान गाजवणार

Abhijeet Khandekar

`अपेक्स’ प्रकरणी आयुक्तांनी खुलासा करावा

Archana Banage

जिल्हय़ात संततधार पावसाने जनजीवन ठप्प

Patil_p

कराड पालिकेच्या ताफ्यात नवी रुग्णवाहिका दाखल

Patil_p

सातारा : रूग्णांचा आकडा हजारासमीप

Archana Banage

ऑनलाईन शाळा सुरु होण्याच्या नुसत्याच वावडय़ा

Patil_p