Tarun Bharat

सांगली : कडेगांव नगरपंचायत आरक्षण सोडत जाहीर

कडेगांव : प्रतिनिधी

कडेगांव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागवर आरक्षणाची सोडत शुक्रवारी प्रांताधिकारी तथा पीठासन अधिकारी गणेश मरकड, मुख्याधिकारी कपिल जगताप यांच्या उपस्थितीत कडेगांव नगरपंचायत येथील डॉ.पतंगराव कदम सभागृहात जाहिर झाली.लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी पद्धतीने आरक्षण काढून ते जाहीर करण्यात आले.

मात्र आरक्षणामुळे भाजपा व काँग्रेसच्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. १७ प्रभगापैकी ९ प्रभागात महिलांचे आरक्षण पडले आहे. तर आरक्षण सोडतमुळे डिसेंबर महिन्यातच या निवडणुक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक नगरसेवकांच्या प्रभागात आरक्षणात बदल झाले आहेत तर सर्वसाधारण राखीव प्रभागात मागासवर्गीय आरक्षण निघाल्यामुळे अनेकांची गोची झाली आहे.

१७ प्रभागापैकी ५ प्रभागामध्ये सर्वसाधारण जागा, अनुसूचित जाती १ जागा, अनुसूचित जाती महिला १ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग २ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ३ जागा, सर्वसाधारण महिला ५ जागा राखीव आहेत. एकुण १७ प्रभागापैकी ९ प्रभाग हे महिलांसाठी राखिव झाले आहेत. त्यामुळे कडेगाव नगरपंचायतीमध्ये महिलाराज असणार असल्याचे चित्र दिसुन येते.

Related Stories

‘या’ विद्यार्थ्याना परीक्षेला मुकावे लागणार,दहावी बारावीच्या परीक्षांपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय

Archana Banage

योगी आदित्यनाथ यांना करावा लागला तरुणांच्या रोषाचा सामना

Archana Banage

गावचे कारभारी ठरले चिट्टीवर

Patil_p

राज्यपालांबाबत उदयनराजेंचे पंतप्रधानांना साकडे

Patil_p

“पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका”

Archana Banage

सांगली : खटाव येथे विलगीकरण केंद्रातून कोरोना रुग्णाचे पलायन

Archana Banage