Tarun Bharat

सांगली : कवठेएकंद येथे दसरा अत्यंत साधेपणाने

आतषबाजी न करता शासकीय वाहनातून मुर्तीची ग्रामप्रदक्षिणा

प्रतिनिधी / तासगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे दसऱ्या दिवशी होणारा येथील ग्रामदैवत श्री. बिराडसिद्ध देवस्थानचा यात्रा सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला शोभेच्या दारूची आतषबाजी न करता हा पहिलाच सोहळा होता. गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने कवठेएकंद येथील दसऱ्या दिवशीचा सोहळा ही साधेपणाने साजरा करण्यासाठी पाऊल उचलले होते त्यास सकारात्मक प्रतिसादही बैठकीत मिळाला होता. रविवारी दसऱ्या दिवशी श्री सिद्धराज महाराज व श्री बिरदेव महालिंगराया यांची मूर्ती पालखी ऐवजी सजवलेल्या शासकीय वाहनात ठेवण्यात आली व शिलंगण चौक येथे दसऱ्याचे पूजन होऊन ग्रामप्रदक्षिणा पोलीस बंदोबस्तात सुरू झाली.

नागावकवठे येथील देवघरे इथपर्यंत आल्यानंतर व तेथे बहिणीला भेटण्याचा विधी पूर्ण झालेनंतर ही वाहने त्याच मार्गावरून परत येऊन ग्राम प्रदक्षिणा पूर्ण झाली. गेल्या काही वर्षात प्रथमच शोभेच्या दारूची आतषबाजी ना होता हा सोहळा पार पडला होता तर आतषबाजी न झाल्याने ग्रामस्थांच्यातून नाराजी व्यक्त होत होती.

तहसिलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी या ग्रामप्रदक्षिणेत प्रत्यक्ष सहभाग दाखवून योग्य नियोजन केले. तर स.पो.नि.पंकज पवार उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, रत्नदीप साळोखे, विश्राम मदने, यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दोन्ही मुर्ती मंदिरासमोर येताच परिसरातून काही प्रमाणात आकाशात औटांची आतषबाजी झाली आणि ग्रामस्थानी एकच जल्लोष केला. ग्रामप्रदक्षिणा मार्गावर पणती, मेणबत्ती लावून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यामुळे दीपमालानी ही रात्र सजल्याचे पाहवयास मिळाले. नेहमी 12 तास चालणारा हा सोहळा यावर्षी केवळ दोन तासात समाप्त झाला.

Related Stories

सांगली : खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इस्लामपूरात एकाची आत्महत्या

Archana Banage

सांगली : जतजवळ सोने व्यापाऱ्यावर दरोडा, सव्वा दोन कोटीचे सोने लंपास

Archana Banage

सांगलीत ‘ऑनलाईन टिचींग’ चा फंडा

Archana Banage

सांगली जिल्ह्यात दुपारी साडेतीन पर्यंत 68 टक्के मतदान

Archana Banage

यशवंतराव चव्हाणांच्या स्मारकाचा निर्णय नाहीच; जागा मालकांचा तीव्र विरोध

Archana Banage

सांगली जिल्ह्यातील 50 ते 60 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

Abhijeet Khandekar