Tarun Bharat

सांगली : कवलापुरच्या जमिनीची किरीट सोमय्या यांनी केली पाहणी; पोलिसांची तारांबळ

कुपवाड / प्रतिनिधी

भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी दुपारी अचानक धावती भेट घेऊन कवलापुर ते कुपवाड रस्त्यालगत रेवान्ना मळ्याशेजारच्या एका मोठे क्षेत्र असलेल्या जमिनीची पाहणी केली.

ते सोमवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. या जागेबाबत त्यांनी संबंधित जामिनीची का पाहणी केली ? यामागचे नेमके कारण काय ? याबाबत सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, सोमय्या यांच्या अचानक दौऱ्यामुळे कुपवाड पोलिसांची तारांबळ उडाली. जमीनीची पाहणी करून ते तातडीने सांगलीकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे,भाजपा नेते मकरंद देशपांडे, उद्योग मित्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष संजय अराणके, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, डॉ. भालचंद्र साठे, महावीर मालाणी, उद्योजक महेश पटेल उपस्थित होते.

Related Stories

राजेंद्र पाटील-यड्रावकरांच्या समर्थनात जयसिंगपुरात कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन

Abhijeet Khandekar

सांगली युवक काँग्रेसच्यावतीने बेरोजगार दिन जाहीर करत आंदोलन

Archana Banage

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची नगरपालिकेत शिव्यांची लाखोली

Archana Banage

सांगली : अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Archana Banage

विधिमंडळात जावई आणि सासऱ्यांचं ‘वर्चस्व’ राहणार

datta jadhav

जिल्हय़ात लसीकरण 30 लाखांच्या पार

Patil_p