प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील कासेगाव पोलीस ठाण्यातील सात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. गेल्या आठवडयात सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पाठोपाठ सात जण पोझिटिव्ह सापडल्याने पोलीस ठाणे हादरले आहे. दरम्यान शुक्रवारी इस्लामपूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली.
सोमवारी रात्री कासेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर इस्लामपूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कातील सात कर्मचाऱ्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. शुक्रवारी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या कर्मचाऱ्यांवर येथील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येणार असल्याची माहिती सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राणोजी शिंदे यांनी दिली.


previous post