Tarun Bharat

सांगली : कुपवाड मुख्य रस्त्यावरील खड्डे महिलांनी मुजवले; मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे झोपेचे सोंग

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाडपासून सुतगिरणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे मनपाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेर कुपवाडच्या महिलांनी खड्डे मुजविण्याची मोहीम हाती घेतली.

कुपवाड ते सुतगिरणी मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. महापालिका कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर हा मुख्य रस्ता आहे. या खड्ड्यांमुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत. ही सर्व खड्डे मुजविण्या संदर्भात कुपवाड शहरातील विविध संघटना,नागरिक, महिला मंडळांनी महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदने दिले होती. तरीही महापालिका प्रशासनाने लक्ष दिले नाही. सलग पावसाळ्यामुळे खड्ड्यातील वाहनधारकांना पाण्याचा अंदाज येत नाही. खड्ड्यांसमोर विजेचे खांब असल्याने दररोज लहान मोठे अपघात होत आहेत.

महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या खड्ड्यापासून कार्यालयात ये जा करतात. मात्र, त्यांच्या डोळ्यांना खड्डा दिसत नाही. मनपा प्रशासन आणि नगरसेवकांनी खड्डे मुजविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील नवचेतना महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा उपाध्ये, सीमा पाटील, सुजाता कवठेकर, अंजु दीक्षित, माधुरी उपाध्ये, स्वरूपाराणी पाटील, अर्चना बोरगावे, समीता कवठेकर या महिलांनी रस्त्यावर उतरून स्वयंप्रेरणेने मुरुम टाकून खड्डे मुजवले. या महिला मंडळाचे शहरातून कौतुक होत आहे. याचा बोध घेवुन मनपा प्रशासनाने मुख्य रस्त्यावर पड़लेले खड्डे मुजवावेत, अशी महिला वर्गातून मागणी होत आहे.

Related Stories

जिल्ह्याच्या सर्वांगीण, शाश्वत विकासासाठी ‘व्हिजन सांगली@75’ फोरमची स्थापना

Archana Banage

आरआयटीची एआयसीटीई-आयडिया लॅबसाठी निवड

Archana Banage

तरुणीवर बलात्कारप्रकरणी निलंबीत पोलीस निरीक्षक विपीन हसबनिसना अटक

Archana Banage

कुपवाड व तानंगमध्ये दोघांची गळफास घेत आत्महत्या

Archana Banage

सांगलीत विद्यार्थी रस्त्यांवर;खड्डे बुजवत केले अनोखे आंदोलन

Abhijeet Khandekar

महाविकास आघाडीचा सांगलीत जल्लोष

Archana Banage