Tarun Bharat

सांगली : कृष्णाकाठावरच्या १६ गावांत यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव नाही

प्रतिनिधी / भिलवडी

महापूर आणि कोरोनामुळे यावर्षी पलूस तालुक्यातील कृष्णाकाठावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार नाही. कृष्णाकाठावर १६ गावांनी सामाजिक भान राखत यावर्षी सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केलेला नाही. यामुळे गावात सार्वाजनिक एकही गणपती बसलेला नाही. त्यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. मात्र, घरगुती गणपती सर्वत्र राजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कैलास कोडग यांनी गावो गावी जाऊन गणेशोत्सक घरगुती पद्धतीने साजरा करा असे अवाहन केले. याला मंडळांनी चांगला प्रतिसाद दिला व सार्वजनिक मंडळांनी आपल्या घरातच गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

भिलवडी, अंकलखोप, औदुंबर, नागठाणे, संतगांव, सुर्यगांव, धनगांव, भुवनेश्वरवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, भिलवडी स्टेशन, वसगडे, ब्रम्हनाळ, खटाव, सुखवाडी, चोपडेवाडी, महावीरनगर, ब्रम्हानंदनगर, या पोलिस ठाण्याअंतर्गत आसणारया येणार्‍या गावात वर्षाला प्रत्येक गावात पंधरापेक्षाही अधिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोना आणि महापूरामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका असे आवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक कैलास कोडग यांनी केले होते. जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा उप्पर पोलिस अधिक्षक मनिषा दुबुले तासगांव उपविभागीय अधिक्षक अंकुश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक कैलास कोडग यांनी गावो-गावी जाऊन गणेश मंडळांना आवाहन केले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

भिलवडी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १६ गावात सुमारे २५० मंडळांच्या नोंदी आहेत. पोलिसांच्या प्रबोधनामुळे गावात सार्वजनिक गणपती बसलेला नाही. २०१९ च्या महापूरात कृष्णाकाठास मोठा फटका बसला आहे. डोळ्यादेखत झालेली हाणी न भरून निघणारी आहे. हाजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. महापूरातुन सावरतोय ना तोवर कोरोनाचे महाभयानक महामारीचे संकट ओढले गेले. यामुळे कृष्णाकाठ सधन असूनही आर्थिक मंदीच्या सावटाखाली वावतोय यामुळे या भागात खाकीच्या मार्गदर्शनाखाली यंदा घरगुती गणोत्सव साजरा करण्यातच सर्वानी समाधान मानले.

Related Stories

सांगलीत शामरावनगरमध्ये तीव्र पाणी टंचाई

Abhijeet Khandekar

सांगली : कोरोनामुक्तीनंतर तानाजी पाटील पुन्हा मैदानात…

Archana Banage

कनिष्ठ लिपिकासह तिघे ‘लाचलुचपत’च्या जाळय़ात

Archana Banage

सांगली : परतीच्या पावसाचा कृष्णा काठाला फटका

Archana Banage

कुपवाडमध्ये विवाहीत प्रेमीयुगलाची विषप्राशन करून घेतला गळफास

Abhijeet Khandekar

सांगली : रोटरीच्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग द्यावा : गव्हर्नर संग्राम पाटील

Archana Banage
error: Content is protected !!