Tarun Bharat

सांगली जिल्हय़ात आज कोरोनाचे चार बळी, नवे 95 रूग्ण

सांगली शहरातील माजी आमदार

प्रतिनिधी / सांगली

शनिवारी सांगली जिल्हय़ात कोरोनाचे नवे 95 रूग्ण वाढले तर 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्ण संख्या 1545 झाली आहे. तर जिल्हय़ात कोरोनाने चार बळी गेले आहेत. मिरजेतील एका राजकीय नेत्यासह आणखीन एका महिलेचा, समडोळी येथील वृध्दाचा तसेच तासगाव तालुक्यातील चिंचणींच्या वृध्देचा बळी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात एकूण बळी 48 झाले आहेत.

सांगली – मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात 57 रूग्ण

सांगली-मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात रॅपिड ऍण्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात रूग्ण आढळून येत चालले आहेत. सांगली शहरात जुनी धामणी रोड हनुमान नगर येथे दोन, नळभाग, हडको कॉलनी, पाटील गल्ली, खणभाग, विश्रामबाग, साईनाथनगर, राममंदिर, मिशन कंपाउंड, ममता हॉस्पिटल जवळ, रेवणी गल्ली, राजवाडा चौक येथे रूग्ण आढळून आले आहेत. तर मिरज शहरात चौमडेश्वर कॉम्प्लेक्स येथे एक, कुरणे गल्ली येथे दोन,घाट रोड, समतानगर येथे प्रत्येकी एक, मुजावर गल्ली येथे दोन, नवीन इंग्लिश स्कूलजवळ, आयडियल स्कूलजवळ, एकता कॉलनी मालगाव रोड, वानलेसवाडी आणि ख्वाजा वस्ती येथे रूग्ण आढळून आले आहेत. तसेच संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असणाऱया एका होमगार्डला कोरोनाची लागण झाली आहे. संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घेण्यात आलेल्या कॅम्पमध्ये मात्र इतर सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सांगली येथे 38 नवीन रूग्ण वाढले तर मिरज येथे 19 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरातील एका माजी आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

आटपाडी येथील वैद्यकिय अधिकारीच बाधित

आटपाडी तालुक्यात दिवसभरात 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये आटपाडीतील प्रसिध्द आयसीयू सेंटरमधील आठ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोना सेंटरची जबाबदारी असणारे ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टरही कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दिंघजी येथील एक प्रसिध्द महिला डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात एकाच दिवशी 18 बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी शहर 9, तडवळे येथे सहा, दिंघजी येथे एक आणि पत्रेवाडी येथे एक असे रूग्ण आढळले आहेत.

जत शहरात एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ शहरात दोन, मिरज तालुक्यातील हरीपूर, अंकली आणि खंडेराजूरी येथे प्रत्येकी एक रूग्ण तर भोसे येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. पलूस शहरात एक व खटाव येथे एक बाधित झाला आहे. शिराळा तालुक्यातील वाकुर्डे येथे एक आणि गवळेवाडी येथे एक, तासगाव तालुक्यातील बस्तवडे, मांजर्डे, सावळज आणि निमणी येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे.

चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरज शहरातील एका राजकीय नेत्याचा कोरोनाने बळी गेला आहे. त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते ते 62 वर्षाचे होते. मिरज शहरातील दिंडी वेस भागात राहणाऱया 64 वर्षीय महिलेचाही कोरोनाने बळी गेला आहे तिच्यावर मिरजेतील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. मिरज तालुक्यातील समडोळी येथील 78 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी मृत्यू झाला आहे. तर तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील 75 वर्षीय वृध्देचाही बळी गेला आहे.. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोना बळीची संख्या आता 48 झाली आहे.

41 जण कोरोनामुक्त

जिल्हय़ात शनिवारी रूग्ण वाढले असले तरीसुध्दा दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्हय़ातील उपचार सुरू असणारे 41 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 18 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सिव्हील सर्जनसह जिल्हा आरोग्य अधिकारी निगेटिव्ह

जिल्हय़ातील कोरोना नियंत्रण कक्षात कोरोना शिरल्याने याठिकाणी 54 कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये कोरोना नियंत्रण कक्षाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह कार्यरत असणाऱया सर्वाचे स्वॅब घेतले होते. यातील हे तीन्ही अधिकारी निगेटिव्ह आले आहेत. तर पाच कर्मचाऱयांचे अहवाल मात्र पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण 1545
बरे झालेले 754
उपचारात 743
मयत 48

Related Stories

बिबट्या मादी व बछड्याची भेट कॅमेऱ्यात कैद

Abhijeet Khandekar

आरोग्य सेविकांना दमदाटी प्रकरणी दोघांवर गुन्हा

Archana Banage

पुलांचे भरावक्षेत्र कमी करून कमानी बांधकाम करा

Archana Banage

पत्रकारांसाठी कोविड केअर सेंटर, वैद्यकीय उपचार वेळेवर मिळावेत

Archana Banage

वृद्धाश्रमातून दहा बाधित रुग्ण जिल्हा रुग्णालयात

Patil_p

अन्यथा पदाधिकारी, अधिकरी, सदस्यांच्या घरासमोर आंदोलन करणार

Archana Banage