Tarun Bharat

सांगली : कोरोनाचे बोगस प्रमाणपत्र देणारा ‘सिनर्जी’चा कर्मचारी जाळ्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सापळा रचून रॅकेटचा पर्दाफाश, व्यवसायिक रुग्णालयातील गोरखधंदा चव्हाट्यावर

प्रतिनिधी / मिरज

बाह्य जिह्यातील व्यक्तींना प्रवेश मिळवून देण्यासाठी कोरोना निगेटीव्ह असल्याचे बोगस प्रमाणपत्र देणारा सांगली-मिरज रस्त्यावरील चंदनवाडी येथील सिनर्जी मल्टीस्पेशालीटी या खासगी व्यवसायिक हॉस्पिटलमधील आयटी विभागाचा कर्मचारी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या जाळ्यात सापडला आहे. केवळ पाचशे रुपयांच्या आर्थिक लालसेपोटी त्याने शेकडो जणांना कोरोना निगेटीव्ह, आरटीपीसीआर चाचणीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. स्वप्नील सुरेश बनसोडे (वय 25, रा. ढवळी) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नांव असून, त्याने आत्तापर्यंत किती जणांना निगेटीव्ह प्रमाणपत्रांचे वितरण केले, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकट काळात खासगी व्यवसायिक हॉस्पिटलमध्ये निगेटीव्ह प्रमाणपत्र वितरणाचा गोरखधंदा चव्हाट्यावर आल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रकोप झाल्यामुळे बाह्या जिह्यातील व्यक्तींना कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र नसल्यास जिह्यात प्रवेशबंदी आहे. त्यामुळे कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अनेकजण खटाटोप करीत आहेत. सिनर्जी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमधील आयटी विभागाचा कर्मचारी असलेला स्वप्नील बनसोडे हा बोगस प्रमाणपत्र देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार गायकवाड आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला.

प्रारंभी एक बनावट ग्राहक रुग्णालयाकडे पाठवून त्याला स्वफ्नील यास संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सदर ग्राहकाने स्वप्नील याला फोन करुन बोगस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी काय करावे लागेल, असे विचारले असता स्वप्नील याने व्हॅटस्ऍपवर आधार कार्ड पाठवून पाचशे रुपये द्या, मी तुम्हाला प्रमाणपत्र देतो. रुग्णालयाच्या खालील बाजूस आल्यानंतर मला भेटा. आणि प्रमाणपत्र घेऊन जा, अशी बतावणी त्याने केली. त्यानुसार सदर ग्राहक प्रमाणपत्र घेण्यासाठी गेला असता, पोलिसांनी रुग्णालयात छापा टाकून स्वप्निल बनसोडे याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे सिनर्जी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमधील सही-शिक्का मारलेले कोरोना निगेटीव्ह, आणि आरटीपीसीआर चाचणीचे बोगस प्रमापणपत्र आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक करुन अधिक तपास सुरू केला आहे.

Related Stories

16 लाखाचा बकरा चोरणारे तिघे जेरबंद

Archana Banage

सांगली जिल्ह्यात पुन्हा गव्याची एन्ट्री

Kalyani Amanagi

Sangli : बागेवाडीच्या तरुणाची जतमध्ये आत्महत्या

Abhijeet Khandekar

पोलीस ठाण्यात पेटवून घेतलेल्या ‘त्या’ तरुणाच्या मृत्यू

Archana Banage

कसबे डिग्रज बंधारा परिसरात पोलिसांची कारवाई

Archana Banage

देशमुख ‘ग्रामीण’, शिंदे ‘शहर’ जिल्हाध्यक्ष

Archana Banage