Tarun Bharat

सांगली : कोरोनाने दोघींचा मृत्यू, नवे ९ रूग्ण

प्रतिनिधी / सांगली

रविवारी कोरोनाने सांगली, मिरजेतील दोन महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.  जिल्हय़ात कोरोनाचे एकूण 19 बळी गेले आहेत. नवीन 9 रूग्ण वाढले आहेत. तर 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या आता 641 झाली आहे.

सांगली, कोकळे येथे रूग्ण वाढले
सांगली शहरात दररोज रूग्ण आढळून येत चालले आहेत. रविवारी शहरातील मध्यवर्ती असणाऱया बुरूड गल्ली येथे 73 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आली आहे. तर शिंदेमळा या उपनगरातील 60 वर्षीय व्यक्ती बाधित झाली आहे. कोकळे येथे दोन दिवसापूर्वी आढळून आलेल्या बाधितांच्या संपर्कातील चार व्यक्ती बाधित झाल्या आहेत. त्यामध्ये 33 आणि 26 वर्षीय महिला तसेच तीन आणि सात वर्षाची मुले बाधित आढळून आली आहेत.  मिरज तालुक्यातील सोनी येथील 52 वर्षीय व्यक्ती, बुधगाव येथील 42 वर्षीय व्यक्ती, पलूस येथील 95 वर्षीय महिला अशा जिल्हय़ातील नऊ जण बाधित झाले आहेत.

दोन महिलांचा मृत्यू
सांगली येथील माने प्लॉटमधील 80 वर्षीय महिला आणि मिरजेतील सुंदरनगर येथील 78 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी गेला आहे. या दोघींचा चार दिवसापूर्वी स्वॅब पॉझिटिव्ह आल्याने या दोघींवर मिरजेतील कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांना आणखीन त्रास होऊ लागल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या दोन महिलांच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील कोरोनाने बळी गेलेल्याची संख्या आता 19 वर पोहचली आहे.

13 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात रविवारी 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्हय़ाला दिलासा देणारी गोष्ट घडली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाचे रूग्ण वाढत होते पण कोरोनामुक्तांची संख्या कमी होत चालली होती. रविवारी एकाच दिवशी 13 जण कोरोनामुक्त झाल्याने उपचारातील रूग्णसंख्या आता 304 वर येवून ठेपली आहे.

11 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 11 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये जुना बुधगाव रोडवरील 65 वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 73 वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय व्यक्ती,  दरीबडीची येथील 28 वर्षीय युवक, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, उमदी येथील 40 वर्षीय व्यक्ती,   कर्नाळ येथील 36 वषीय व्यक्ती, व्यंकोचीवाडी-शिपूर येथील 73 वर्षीय व्यक्ती या नऊ जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील दोन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

चार दिवसात पाच मृत्यू
जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. सलग चार दिवसात पाचजणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. गुरूवारी आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शुक्रवारी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शनिवारी भिकवडी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा,  रविवारी मिरजेतील 78 आणि सांगलीतील 80 वर्षीय अशा दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील मृत्यूचा दर आता वाढू लागला आहे. त्यामध्येच जिल्हय़ातील नऊ जणांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण   641
बरे झालेले    318
उपचारात     304
मयत         19

Related Stories

कसबा बीडमध्ये सोन्याच्या पावसाची पुनरावृत्ती ; भांगलण करताना महिलेला सापडली सुवर्णमुद्रा

Archana Banage

ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी होतेय

datta jadhav

मिरजेत गोडाऊन फोडून ३५ लाखांची विदेशी दारु लंपास

Archana Banage

नगरमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त

prashant_c

महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 16 लाखांच्या उंबरठ्यावर!

Tousif Mujawar

कासट मार्केटमधील अतिक्रमीत टप्रयाना चोरटय़ाचे ग्रहण

Patil_p