Tarun Bharat

सांगली : कोरोनाने दोन बळी, नवे रूग्ण २३

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाचे नवीन 23 रूग्ण वाढले. तर विक्रमी 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या आता 704 झाली आहे. तर उपचारातील रूग्णसंख्या 306 आहे. यातील 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सांगली शहरातील दोघांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील बळीची संख्या आता 23 वर पोहोचली आहे.

भिकवडी खुर्द, निगडी, बामणोळी येथे बाधीत
कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द हे गावही कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. याठिकाणी मंगळवारी नवीन सहा रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 42 आणि 82 वर्षींय व्यक्तीचा तर 40, 65, 50 वर्षीय महिला आणि दोन वर्षाचा बालक यांचा समावेश आहे. जत तालुक्यातील निगडी येथे तीन व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. त्यामध्ये 34 वर्षाची महिला, 17 आणि 19 वर्षाचे युवक यांचा समावेश आहे. मिरज तालुक्यातील बामनोळी येथील 32 वर्षीय व्यक्ती आणि 72 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

सांगली, मिरज आगळगाव, कोकळे, भोसे चिंचणी, हिंगणगाव येथे रूग्ण वाढले
सांगली शहरात कोरोनाचा सलग आठ दिवस झाले कहर सुरूच आहे. सांगली शहरात चार नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये 27 आणि 65 वर्षीय व्यक्ती तर 24 आणि 63 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर मिरज शहरात तीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील आगळगाव येथील 52 वर्षीय महिला, कोकळे येथील 32 वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील भोसे येथील 20 वर्षाची युवती, कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील 36 वर्षीय व्यक्ती, हिंगणगाव येथील 34 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. या सर्वांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विक्रमी 36 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ात एकाच दिवशी 36 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकाच दिवसात इतक्या मोठय़ाप्रमाणात रूग्ण कोरोनामुक्त झाले नव्हते. मंगळवारी हे घडले आहे. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या आता 306 इतकी खाली आली आहे. हे सर्वजण ठणठणीत बरे झाले असून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्य़ाचे डॉक्टरांनी सांगितले.

15 जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱया रूग्णांपैकी 15 रूग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असणाऱयामध्ये  कानकात्रेवाडी येथील 48 वर्षीय व्यक्ती, व्यंकोचीवाडी येथील 73 वर्षीय व्यक्ती, मिरज येथील 73 वर्षीय व्यक्ती,  नेलकरंजी येथील 53 वर्षीय व्यक्ती, आगळगाव येथील 52 वर्षीय व्यक्ती, सराटी येथील  44 वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 38 वर्षीय व्यक्ती, दरिबडीची येथील 28 वर्षीय युवक, जत येथील 32 वर्षीय व्यक्ती, उमदी येथील 40 वर्षीय व्यक्ती, कर्नाळ येथील 36 वषीय व्यक्ती, या 11 जणांचा समावेश आहे. तर परजिल्हय़ातील चार रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सांगलीतील दोघांचे बळी
सांगली शहरातील चांदणी चौक येथे राहणाऱया 69 वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरू असतानाच तिचा मंगळवारी मृत्यू झाला. ही व्यक्ती शहरातील एका प्रसिध्द डॉक्टरांचे चुलते होते. तर सांगली शहरातीलच वडर गल्ली येथे राहणाऱया 65 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असतानाच तिचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हय़ात मंगळवारी कोरोनाने दोघांचे बळी गेले आहेत. जिल्हय़ात एकूण बळीची संख्या आता 23 झाली आहे.

सहा दिवसात नऊ मृत्यू
जिल्हय़ात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. सलग सहा दिवसात नऊजणांचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. गुरूवारी आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शुक्रवारी पलूस तालुक्यातील नागठाणे येथील 60 वर्षीय व्यक्तीचा, शनिवारी भिकवडी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा,  रविवारी मिरजेतील 78 आणि सांगलीतील 80 वर्षीय महिलांचा मृत्यू झाला आहे.  सोमवारी मिरजेतील 55 वर्षीय व्यक्ती आणि 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी सांगली शहरातील 69 वर्षीय व्यक्ती आणि 65 वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण   704
बरे झालेले    375
उपचारात     306
मयत         23

Related Stories

एकनाथ शिंदेंच्या गोटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

Abhijeet Shinde

सांगली : आटपाडीत तात्काळ १०० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर करा : आमदार गोपीचंद पडळकर

Abhijeet Shinde

युवतीच्या खूनप्रकरणाचा चार तासात पर्दाफाश

Patil_p

विधानपरिषद निवडणूक : जुना हिशोब चुकता करण्याची दोन्ही गटांना संधी

Sumit Tambekar

सांगलीजवळ माधवनगर मध्ये पिशव्यांच्या कारखान्याला आग

Abhijeet Shinde

भीमा कोरोगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!