Tarun Bharat

सांगली : कोरोना कक्षातील पाच कर्मचारी पॉझिटिव्ह

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह

प्रतिनिधी/सांगली

जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षात कोरोना शिरल्याने नियंत्रण कक्षातील 54 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण कक्ष प्रमुख तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुपाल गिरीगोसावी, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह 54 जणांचे घेतले होते.

यातील डॉ.संजय साळुंखे ,डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ, विवेक पाटील यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 43 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

कोरोना नियंत्रण कक्षामध्ये कोरोना शिरल्याने जिल्हा परिषद मध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि कोरोना नियंत्रण कक्ष सॅनिटायझर करण्यात आला होता. तसेच जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या लोकांच्यावर निर्बध घालण्यात आली आहेत.

Related Stories

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ओघ सुरू ; १९७ कोटी जमा

Archana Banage

कॉलेज-शाळांना दिवाळीत फक्त पाच दिवस सुट्टी

Patil_p

खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

Archana Banage

सांगली जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर राज्यापेक्षा जास्त

Archana Banage

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

prashant_c

लालूंच्या घरासह १५ ठिकाणांवर CBI चे छापे

Archana Banage