Tarun Bharat

सांगली : कोरोना रूग्णांसाठी मिरजेत उभारला अतिरिक्त ऑक्सिजन टँक

Advertisements

प्रतिनिधी / मिरज

दररोज वाढत असलेल्या कोरोना रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने युध्द पातळीवर काम करीत मिरज शासकीय रुग्णालयात सुमारे सहा हजार किलो लिटर क्षमतेचा अद्ययावत ऑक्सिजन टँक उभारला आहे. कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनअभावी होणाऱया मृत्यूवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात प्रशासनाने अनेक सुविधा दिल्या आहेत. व्हेंटिलेटर व एच.एफ.एन.ओ. या विशेष उपचार पद्धतीची सुविधा येथे उपलब्ध आहे. सध्या रुग्णालयात 54 व्हेंटिलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणांच्या माध्यमातून गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मात्र, दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. या वाढत्या रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठाही वाढविणे आवश्यक बनले होते. त्यासाठी वाढीव ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते.

यापूर्वी शासकीय रुग्णालयात 6 हजार किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक बसविण्यात आला होता. मात्र, तो अपुरा पडत असल्याने अतिरीक्त सहा हजार किलो लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक उभारण्याचा निर्णय निर्णय तात्काळ घेतला व दोनच दिवसात त्याची अंमलबजावणीही केली, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते. आता ऑक्सिजन टँकची क्षमता वाढविल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी लक्ष घालून याबाबत तत्पर कार्यवाही केली.

Related Stories

किरकोळ कारणातून तरुणाला भोकसले,अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

सांगली : सात जणांचा बळी, नवे 139 रूग्ण

Abhijeet Shinde

सांगली : जत तालुक्यात रुग्णसंख्या रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत : ना. जयंत पाटील

Abhijeet Shinde

सांगली : ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वीज कनेक्शन तोडल्यास खबरदार

Abhijeet Shinde

सांगली : अन्यायकारक शेतकरी कायदा रद्द करा – राज्यमंत्री विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

एफआरपीचे तुकडे करण्याचा राज्य सरकारचाच प्रस्ताव : सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde
error: Content is protected !!