Tarun Bharat

सांगली : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : पालकमंत्री

Advertisements

डफळापुर येथे कोविड सेंटरचे उद्घाटन, जत येथील कोविड आढावा बैठकीत सूचना

प्रतिनिधी / जत

तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन व जनता कर्फ्यूची प्रभावीपणे अंमलबजावणी करा. संबंधित यंत्रणेने कोरोनाविषयक  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करावी. खासगी हॉस्पिटल व कोव्हिड सेंटर बाधित रुग्ण दाखल करतेवेळी डिपॉझिट रक्कम घेत असतील तर ते चुकीचे आहे, त्यांच्यावर कारवाई करा वाढता संसर्ग थांबवण्यासाठी उपाययोजना करा अश्या सूचना संबंधित विभागांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. मंत्री पाटील जत येथील कोरोनाच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते.

यावेळी आमदार विक्रम सावंत,नगराध्यक्षा सौ. शुभांगी बन्नेनवर, उपसभापती विष्णू चव्हाण,जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, डीवायएसपी रत्नाकर नवले, तहसीलदार सचिन पाटील,आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, बीडिओ अरविंद धरणगुत्तीकर, माजी सभापती सुरेश शिंदे, उपनगराध्यक्ष आप्पा पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, कार्याध्यक्ष  उत्तम चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, विक्रम ढोणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, ज्या गावात कोरोनाबाधितांची संख्या आधिक आहे. त्या गावात जनता कर्फ्यू सक्तीने करावे. विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करा. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांना दमदाटी केल्यास शासकीय कामात अडथळा या अनुषंगाने  कारवाई करा. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांनाही होम आयसोलेशन करा. चेक पोस्टच्या ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बंदोबस्त कडक करावा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Related Stories

इस्लामचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची अशी ही जयंती

Abhijeet Shinde

सांगली : कोणतीच रेल्वे कायमस्वरूपी रद्द नाही, अफवा पसरविणाऱ्यांवर होणार कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापूर सांगली राज्य मार्गावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

Abhijeet Shinde

सांगली : दिघंचीतील महिला डॉक्टरला कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

सांगली : बामनोलीच्या माजी तंटामुक्त अध्यक्षांची गळफास घेत आत्महत्या

Abhijeet Shinde

धबधब्यातून दरीत कोसळला पर्यटक

Kalyani Amanagi
error: Content is protected !!