Tarun Bharat

सांगली : ‘कोव्हिड’ काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘विश्वास’ हेल्पलाईन

जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम, तज्ञ संस्था म्हणून ‘शुश्रुषा’संस्था विविध उपक्रम राबविणार

प्रतिनिधी / सांगली

राज्यासह सांगली जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना आपत्तीमुळे भयग्रस्त होऊ नये. लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, भविष्याविषयी काळजी, आजाराविषयीची वाढती भीती, समज-गैरसमज यामुळे लोकामध्ये मानसीक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने विश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..! हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

कोव्हीड आपत्तीचा दुष्परिणाम शरीरा इतकाच माणसांच्या मनावरही होत आहे. त्यामुळे अनेकदा व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद याबरोबरच कोव्हिडपश्चात रुग्णामध्ये आत्महत्येचे विचार येऊ नयेत व सामान्य नागरिकांच्या मनातील कोव्हीडविषयी अकारण भीती कमी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘ हा अभिनव उपक्रम हाती घेवून मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

या उपक्रमाचा फायदा प्रत्येक कोव्हिड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. ही योजना सामान्य माणसाला आधार देणारी असल्याने प्रशासनास सर्व घटकांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधकारी डॉ. अभिजित चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विश्वास कोरोना सोबत जगण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था कार्य करणार आहे. शुश्रुषा संस्थेचे अध्यक्ष व मानस तज्ञ कालिदास पाटील म्हणाले, सध्याच्या वास्तव परिस्थितीला सामोरे जाता न येणाऱ्या अनेक व्यक्तींना आत्महत्येपासून वाचविण्यासाठी व कोरोना सोबत भीतीमुक्त जगण्यासाठी शुश्रुषाच्या मानसतज्ञांची टीम कार्यरत राहणार आहे. 9422627571 हा योजनेचा मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञांकरवी मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे,सोशल मीडिया द्वारे प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

Related Stories

सन १९८४ पासूनचे सर्व खरेदी दस्त ऑनलाईन होणार

Archana Banage

सांगलीचा महापूर आराखडा तयार करण्यासाठी जपानकडून हेमंत धुमाळांची निवड

Archana Banage

‘हर हर महादेव’ या चित्रपटावर बंदी घाला ; मावळा युवा महासंघाची निदर्शने

Archana Banage

सांगली : ‘या’ गावातील भाजप महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Archana Banage

सांगली : विजेचा धक्का लागून दोन युवकांचा मृत्यू

Archana Banage

कोरोनाच्या काळात जनतेचे कैवारी मात्र अज्ञातवासात

Archana Banage