Tarun Bharat

सांगली : गवळेवाडीत ४ रुग्णांची भर एकूण संख्या १४ वर

Advertisements

प्रतिनिधी / शेडगेवाडी

शिराळा तालुक्यातील गवळेवाडी येथील 55, 32 व 28 वर्षीय पुरुष व नाठवडे येथील 8 वर्षाच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून गवळेवाडी येथील एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे.

येथील रुग्णांचे मुंबई कनेक्शन नसल्याने कोरोनाचा संसर्ग पसरला कसा असा प्रश्न समोर येत आहे. या प्रश्नांची उकल झाल्यास संसर्ग रोखता येईल त्यामुळे रुग्णांनी सत्य माहिती आरोग्य विभागाला द्यायला हवी. काल येथील 55, 32 व 28 वर्षीय पुरुषांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना मिरज येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथील रुग्ण संख्या 14 झाली असून त्यांच्या संपर्काल 5 लोकांना शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले आहे.

कुंभवडेवाडी येथील अगोदर सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मुलाला शिराळा येथे संस्थात्मक विलगीकरन करण्यात आले होते. त्या 8 वर्षाच्या मुलाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी प्रवीण पाटील, वैधकीय अधिकारी वासिम जमादार, ग्रामसेविका मुलाणी, डॉ. रेणके, (सी.एच.ओ.)आरोग्य सहाय्यक एन. एम. मुल्ला, आरोग्य सेवक पी. यु.शिंदे, आरोग्यसेविका महाडीक, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी उपाय योजना सुरु केल्या आहेत. तर आरोग्य विभागाच्यावतीने संपर्कातील लोकांची यादी काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.

Related Stories

मिरजेत तरुणाच्या डोक्यात दगड घालून, गळा चिरून निर्घृण खून

Abhijeet Shinde

सातारा : जिल्हा पाच हजारापुढे; कराडमध्ये व्हेंटीलेटर अभावी सहावा बळी

Abhijeet Shinde

“विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न केला, तर शिवसैनिक जिथल्या तिथे हिशोब करतात”

Abhijeet Shinde

शिगाव वडगाव रस्ता वाहतुकीस बंद

Abhijeet Shinde

हातकणंगलेत लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

Abhijeet Shinde

मध्यरात्री देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा

datta jadhav
error: Content is protected !!