Tarun Bharat

सांगली : चारही प्रभाग समित्यांच्या पुनर्रचना करुन भाजपला शह देण्याची आघाडीची तयारी

प्रतिनिधी / सांगली

महापालिकेतील सत्तांतरानंतर आता काँग्रेस व राष्ट्रवादीने चार प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहे. चारही प्रभाग समित्यांच्या पुनर्रचना करुन भाजपला शह देण्याची तयारी आघाडीने केली आहे. तसा विषय शुक्रवारी होणाऱ्या विशेष महासभेच्या अजेंड्यावर घेण्यात आला आहे.

महापालिकेत २०१८ साली भाजपची सत्ता आल्यानंतर प्रभाग समित्यांची पुनर्रचना करण्यात आली. यात जास्तीत जास्त प्रभाग समित्या भाजपच्या ताब्यात राहतील, याची दक्षता घेतली गेली. गेली अडीच वर्षे चार पैकी तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे तर एका प्रभाग समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. आता या प्रभाग समितीच्या सभापतीपदावरही आघाडीच्या नगरसेवकांची वर्णी लागावी, यासाठी दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी सरसावले आहेत.

येत्या शुक्रवारी महापालिकेची विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. महापौर,उपमहापौर निवडीनंतर ही पहिलीच सभा होत आहे. ही सभाही ऑनलाईन होणार आहे. या सभेच्या अजेंड्यावर प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेचा विषय घेण्यात आला आहे. प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून भाजपच्या हातून सभापतीपद काढून घेण्याची खेळी आघाडीने आखली आहे. त्यावर शुक्रवारी सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. याशिवाय गुंठेवारी भागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी नव्याने गुंठेवारी समिती स्थापन करण्याचा विषय सभेत चर्चेला घेण्यात आला आहे.

Related Stories

बुधगावच्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी

Archana Banage

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टर ट्रॉल्यांना अचानक आग

Archana Banage

सांगली : मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणावर केला धारदार चाकूने खुनी हल्ला

Archana Banage

मान्सूनसरींची आनंदवार्ता ! १० दिवस आधीच मान्सून धडकणार

Rahul Gadkar

Sangli : सेवानिवृत्त सुभेदाराचा मुलानेच केला खून; कोसारी येथील घटना

Abhijeet Khandekar

सांगली : मार्च पासून कर वसुलीसाठी धडक मोहीम

Archana Banage
error: Content is protected !!