Tarun Bharat

सांगली : जत शहरात घरफोडी 5 लाख 30 हजाराचा मुद्देमाल लंपास

प्रतिनिधी / जत

जत शहरातील मनगुळी प्लॉट खतीब शेरूमच्या जवळ राहणारे मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी (रा.तावशी) ता.अथणी सध्या रा.मनगुळी प्लॉट जत यांच्या घरी कोण नसल्याच्या फायदा घेत अज्ञात चोरट्यांने घर फोडत 5लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
अधिक माहिती अशी की, मल्लिकार्जुन यांच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते.

त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना त्यांच्या गावी घेऊन जाण्यात आले होते. मल्लिकार्जुन हे गावीच असल्याने घरी कोण नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून कपाटातील 2लाख 40 हजार किमतीचे सहा टोळ्यांचे गंटन,40 हजार रुपये किमतीचा सोन्याचा टिक्का,40 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या,40 हजार रुपये किंमतीची एक तोळ्यांची चैन,1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 5 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले,पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी,पोलीस उपनिरीक्षक महेश मोहिते,पोलीस उपनिरीक्षक घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.या घटनेची फिर्याद मल्लिकार्जुन रुद्राप्पा होकांडी यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे अधिक तपास जत पोलीस करत आहे.

Related Stories

कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Archana Banage

राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’

Archana Banage

सांगली : कोकरुडमध्ये 5 रुग्ण सापडल्याने गाव सात दिवस बंद

Archana Banage

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून डॉ. भारत पाटणकर यांचे सांत्वन

Archana Banage

सांगली : शिराळा कृषी विभागाच्यावतीने रब्बी पीकस्पर्धा

Archana Banage

अर्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे वस्त्रोद्योग साखळीतून नाराजी

Archana Banage