Tarun Bharat

सांगली : जाचक व चूकीची उपभोगकर्ता करप्रणाली रदद् करा

शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी / कुपवाड

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शासन निर्णयानुसार उपभोगकर्ता कर लावण्यात आला आहे. त्याची करप्रणाली जाचक आणि चुकीच्या पद्धतीने आहे, ती तातडीने रदद् करावी, अशी मागणी शिवसेनेचे कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली असल्याचे अमोल पाटील यांनी सांगितले.

एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाला उपभोगकर्ता कर घरपट्टी ९६ रुपये तर उपयोगिता कर १०८० रुपये आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे मुश्किलीचे आहे. याशिवाय सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेमार्फत दि.अ. यो.राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत फेरीवाला यांना परवाना आणि ओळखपत्र नोदणी करण्यासाठी उपयोगिता कर भरल्याशिवाय नोदनी परवाना दिला जात नाही, हा नियम जाचक आहे. त्यामुळे शासन स्तरावर एक समिती स्थापन करून सर्व घटकांचा विचार करून उपभोगकर्ता कर प्रणाली अमलात आणावी. सध्या लावण्यात आलेल्या उपभोगकर्ता कराला स्थगिती देण्यात यावी. तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, हात गाडीवाले, फेरीवाले, भाजी विक्रेते, हॉटेल चालक आदी घटकांची या जाचक करातून सोडवणुक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

इस्लामपुरात डोक्यात दगड घालून एकाचा खून

Archana Banage

मिरजेत गांजा जप्त, एकास अटक

Archana Banage

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा कोरोनामुक्त

Archana Banage

किनरेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बैलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश

Archana Banage

सांगली : आटपाडी पोलीस ठाण्याला नवी इमारत : प्रस्ताव पाठविण्याचे गृह राज्यमंत्री यांचे निर्देश

Archana Banage

कुपवाड पोलिसांचा तानंग हद्दीत जुगार अड्डयावर छापा ; ११ जणांना अटक

Archana Banage
error: Content is protected !!